‘हे’ उद्योजग बनले भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती, अंबानींना टाकले मागे, जगातही ११ व्या स्थानी
Mumbai: जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत पुन्हा मोठे बदल झाले आहेत. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी पुन्हा एकदा ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. तर जगभरातील श्रीमंतांच्या यादीत ते ११ व्या स्थानी पोहोचले आहेत.
रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांना मागे टाकत गौतम अदानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.३१ मे रोजी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली. अदानी समूहाच्या १० शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. यामुळे गौतमी अदानी भारतातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी पोहोचले आहेत.

जानेवारीमध्ये अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती. तब्बल ४ महिन्यांनंतर ३१ मे रोजी अदानींचे शेअर्स वधारले आहेत. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली होती.
व्यापारादरम्यान ते 14 टक्क्यांनी वाढले. समूहाची होल्डिंग कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा समभाग सात टक्क्यांच्या वाढीसह 3416.75 रुपयांवर बंद झाला. अदानी पोर्ट्सचे समभागही चार टक्क्यांच्या वाढीसह 1,440 रुपयांवर बंद झाले. व्यवहारादरम्यान अदानी पॉवर 14 टक्क्यांनी वधारला आणि शेवटी नऊ टक्क्यांच्या वाढीसह 759.80 रुपयांवर बंद झाला.
त्याचप्रमाणे अदानी टोटल गॅसचे शेअर्सही नऊ टक्क्यांनी वाढून 1,044.50 रुपयांवर पोहोचले. अदानी विल्मरमध्ये तीन टक्के आणि अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी एनर्जी सोल्युशन्समध्ये दोन टक्के वाढ झाली आहे. एनडीटीव्हीमध्ये आठ टक्के, अंबुजा सिमेंट आणि एसीसीमध्ये दोन टक्के वाढ झाली आहे.
अदानींसाठी २०२३ होते आव्हानात्मक
सर्वोच्च न्यायालयाने हिंडेनबर्ग अहवालातील आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर अदानी समूहासाठी 2023 हे वर्ष खूप आव्हानात्मक होते. अहवालापूर्वी जगातील तिसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती असलेल्या अदानी समूहाच्या समभागांची विक्री झाल्यानंतर क्रमवारीत झपाट्याने घसरण झाली. तथापि, नंतर सुप्रीम कोर्टाने सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ला अदानी समूहाची चौकशी पूर्ण करण्याचे आदेश दिले आणि आणखी चौकशीची गरज नसल्याचे सांगितले. जानेवारीमध्ये अदानींनी जवळपास 12 महिन्यांनंतर अंबानींना मागे टाकले होते परंतु नंतर अंबानींनी पुन्हा आघाडी घेतली. आता अदानींनी पुन्हा अंबानींना मागे टाकले आहे.
जगात पहिल्या स्थानी कोण?
फ्रेंच अब्जाधीश LVMH चे CEO बर्नार्ड अर्नॉल्ट हे 16.93 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. पाठोपाठ टेस्लाचे इलॉन मस्क हे जगातील दुसरे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.












Click it and Unblock the Notifications