PF Big News : आता PFचे पैसे काढण्याची चिंता मिटली; या तारखेपासून ATM व UPI द्वारे मिळणार रोकड!
EPFO Big Update : भविष्य निर्वाह निधी (PF) खातेधारकांसाठी केंद्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता पीएफ खात्यातील रक्कम काढण्यासाठी किचकट फॉर्म भरण्याची किंवा ऑनलाईन पोर्टलवर तासनतास प्रतीक्षा करण्याची गरज उरणार नाही. केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडवीय यांनी पीएफ खातेधारकांसाठी एटीएम (ATM) आणि यूपीआय (UPI) द्वारे पैसे काढण्याची नवीन सुविधा जाहीर केली आहे.

मार्च २०२६ पासून सुविधेचा शुभारंभ!
केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडवीय यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले की, पीएफ खातेधारकांना त्यांच्या हक्काचे पैसे अधिक सुलभतेने मिळावेत यासाठी मंत्रालय युद्धपातळीवर काम करत आहे. ही नवीन यंत्रणा मार्च २०२६ पूर्वी कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. यामुळे पीएफचे पैसे काढणे एखाद्या सामान्य बँक खात्यातून पैसे काढण्याइतके सोपे होणार आहे.
PF एटीएम/यूपीआय सुविधेची महत्त्वाची वैशिष्ट्ये!
७५ टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येणार
खातेधारकांना त्यांच्या एकूण जमा पुंजीपैकी ७५ टक्के रक्कम या नवीन सुविधेद्वारे काढता येईल.
थेट बँक खात्यात जमा
पीएफची रक्कम तुमच्या नोंदणीकृत बँक खात्यात जमा होईल, जिथून तुम्ही एटीएम किंवा यूपीआयद्वारे (PhonePe, Google Pay इ.) ती वापरू शकाल.
किचकट फॉर्मपासून सुटका
सध्या पीएफ काढण्यासाठी विविध फॉर्म भरावे लागतात, जे अनेकांसाठी डोकेदुखी ठरतात. ही नवी सुविधा आल्यावर खातेदाराला कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही.
वेळेची बचत
क्लेम सेटलमेंटसाठी लागणारा वेळ या सुविधेमुळे लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.
आतापर्यंत झालेले बदल आणि सुधारणा!
मंत्रालयाने पीएफ काढण्याची प्रक्रिया आधीच बऱ्याच प्रमाणात सोपी केली आहे. ईपीएफओच्या (EPFO) नव्या नियमांनुसार.
चेकबुक/पासबुकची अट रद्द
आता क्लेम फॉर्म भरताना चेक किंवा पासबुकच्या पहिल्या पानाचा फोटो अपलोड करण्याची गरज नाही.
आधार ओटीपी (Aadhar OTP)
केवळ आधार ओटीपीच्या माध्यमातून पडताळणी पूर्ण करून पैसे काढता येतात.
३ दिवसांत क्लेम
पूर्वी पीएफचे पैसे येण्यासाठी २० ते ३० दिवस लागायचे, मात्र आता केवळ ३ दिवसांत पैसे खातेदाराच्या बँकेत जमा होतात.
सरकारचा उद्देश काय?
श्रममंत्र्यांच्या मते, पीएफची रक्कम ही सर्वस्वी खातेदाराची (कामगाराची) असते. अनेकदा आपत्कालीन स्थितीत पैशांची गरज असताना ही रक्कम वेळेवर मिळत नाही. सर्वसामान्य नागरिक दैनंदिन व्यवहारांसाठी एटीएम आणि यूपीआयचा सर्वाधिक वापर करतात. म्हणूनच ईपीएफओला या आधुनिक पेमेंट सिस्टीमशी जोडल्यास कामगारांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल. ही सुविधा मार्च २०२६ पर्यंत टप्प्याटप्प्याने लागू केली जाईल. तोपर्यंत सध्याच्या 'आधार लिंक्ड' ऑनलाईन पोर्टलवरून पीएफ काढण्याची प्रक्रिया सुरूच राहणार आहे.












Click it and Unblock the Notifications