EPFO चा नवा नियम : तुमचा UAN आधारशी लिंक आहे का? नसेल तर अडकू शकतो पीएफचा पैसा; आजच करा 'हे' काम!

EPFO Rules 2026 How to Link Aadhaar with UAN Online : जर तुम्ही पगारदार कर्मचारी असाल आणि तुमच्या पगारातून दरमहा पीएफ (PF) कापला जात असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आता UAN (Universal Account Number) आधार कार्डाशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. जर तुमचे आधार-UAN लिंक नसेल, तर ऐनवेळी तुम्हाला तुमच्या हक्काचे पैसे काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

EPFO Rules 2026

युएएन हा पीएफसाठी महत्वाचा क्रमांक आहे पण तो आधारशी जोडला तर तुमचे संभाव्य नुकसान टळू शकेल. यामुळे आपण आधार पीएफ युएएन लिंक नसेल तर काय अडचणी येतील आणि घरबसल्या लिंकिंग कशी करावी.

लिंक नसेल तर कोणत्या अडचणी येतील?

  • EPFO च्या बहुतांश सेवा आता डिजिटल झाल्या आहेत. आधार लिंक नसल्यास खालील सेवांमध्ये अडथळा येऊ शकतो:
  • ऑनलाइन पैसे काढणे शक्य नाही: तुम्ही ऑनलाइन क्लेम करू शकणार नाही.
  • पीएफ ट्रान्सफरमध्ये अडचण: जुन्या कंपनीतून नवीन कंपनीत पीएफ ट्रान्सफर करणे कठीण होईल.
  • केवायसी (KYC) अपडेट: तुमच्या खात्याची माहिती अपडेट करता येणार नाही.
  • क्लेम रिजेक्ट होणे: ओळखीची पडताळणी न झाल्यामुळे क्लेम नाकारला जाऊ शकतो.

आधार-UAN लिंक करण्याचे फायदे

  • पीएफ काढण्याची प्रक्रिया जलद आणि सोपी होते.
  • फसवणूक किंवा चुकीच्या व्यक्तीकडून पैसे काढले जाण्याचा धोका टळतो.
  • खात्याशी संबंधित सर्व अपडेट्स मोबाईलवर त्वरित मिळतात.

घरी बसून ऑनलाइन लिंक कसे करावे? (Step-by-Step)

  • १. सर्वप्रथम EPFO च्या Member Portal वर जाऊन लॉग इन करा.
  • २. तुमचा UAN आणि Password टाका.
  • ३. मेनू बारमधील 'Manage' टॅबवर क्लिक करून 'KYC' निवडा.
  • ४. तिथे 'Aadhaar' पर्यायावर क्लिक करून तुमची माहिती भरा.
  • ५. माहिती भरल्यानंतर ती सेव्ह करा. UIDAI कडून पडताळणी झाल्यानंतर १-२ दिवसांत तुमचे आधार लिंक होईल.

महत्त्वाची टीप: तुमचे नाव, जन्मतारीख आणि लिंग हे आधार कार्ड आणि पीएफ रेकॉर्डमध्ये तंतोतंत जुळणे आवश्यक आहे. माहितीमध्ये तफावत असल्यास लिंकिंग प्रक्रिया पूर्ण होणार नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+