आता 5 वर्ष वाट पाहण्याची गरज नाही! 1 वर्षाच्या नोकरीनंतर काढता येणार पीएफचे पैसे; वाचा नवे नियम
Epf withdrawal new rules 2026 : "नोकरदार वर्गासाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता पीएफचे पैसे काढण्यासाठी तुम्हाला ५-१० वर्षांच्या जुन्या नियमांच्या कचाट्यात अडकण्याची गरज नाही. EPFO ने कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करत नियमांत मोठा बदल केला असून, आता अवघ्या एका वर्षाच्या नोकरीनंतर तुम्हाला तुमच्या हक्काचा पैसा आपत्कालीन स्थितीत वापरता येणार आहे.
गुड रिटर्न्सनुसार, EPFO ने पीएफ काढण्याचे नियम अत्यंत सोपे केले असून, आता अवघ्या १२ महिन्यांच्या (१ वर्ष) नोकरीनंतर कर्मचाऱ्यांना आपल्या खात्यातून पैसे काढता येणार आहेत.

खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
यापूर्वी पीएफमधून पैसे काढण्यासाठी विवाहासाठी ५ वर्षे किंवा घरासाठी १० वर्षे अशा विविध अटी होत्या. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ असायचा आणि वेळेवर पैसा मिळत नव्हता. मात्र, आता नव्या बदलांनुसार, एका वर्षाची सलग सेवा पूर्ण केलेले कर्मचारी आपत्कालीन स्थितीसाठी पैसे काढू शकतील. विशेषतः खाजगी क्षेत्रातील आणि कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या तरुणांसाठी हा निर्णय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
कोणत्या कारणांसाठी काढता येणार पैसे?
आरोग्य: स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या गंभीर आजारावरील उपचारांसाठी.
शिक्षण व विवाह: मुलांचे उच्च शिक्षण किंवा स्वतःच्या/मुलांच्या लग्नासाठी.
घर खरेदी: घर खरेदी करणे किंवा घराचे बांधकाम करण्यासाठी.
बेरोजगारी: नोकरी सुटल्यास आर्थिक गरज भागवण्यासाठी पीएफचा मोठा हिस्सा काढता येईल.
रिटायरमेंट फंडवर काय परिणाम होईल?
EPFO ने जरी नियम शिथिल केले असले, तरी कर्मचाऱ्यांना एक सल्लाही दिला आहे. पीएफवर सध्या आकर्षक व्याजदर मिळतो, ज्यामुळे तुमची रक्कम वेगाने वाढते. वारंवार पैसे काढल्याने निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या मोठ्या रकमेत घट होऊ शकते. त्यामुळे केवळ अत्यंत गरज असतानाच पीएफमधून पैसे काढणे शहाणपणाचे ठरेल.












Click it and Unblock the Notifications