दिवाळीत महाराष्ट्रात इतके दिवस सुट्ट्या! बँकेत जाताय? थांबा! 15 दिवसांपैकी 11 दिवस बँक बंद राहणार
Diwali 2025 Bank holiday list october 2025 : सणासुदीचा मोठा काळ सुरू असल्यामुळे बँकांमध्ये कामकाजाच्या दिवसांची संख्या कमी झाली आहे. दसरा आणि इतर उत्सवांमुळे ऑक्टोबरचे पहिले १५ दिवस व्यस्त होते, तर आता पुढील १५ दिवसांत धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज आणि छठपूजा यांसारखे महत्त्वाचे सण येत आहेत. त्यामुळे, जर तुमचे बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल, तर शाखेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी तपासणे अत्यंत आवश्यक आहे!
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) सुट्ट्यांच्या यादीनुसार, ऑक्टोबरच्या उर्वरित १५ दिवसांत देशभरात एकूण ११ दिवस बँका बंद राहणार आहेत.

बँक हॉलिडे लिस्ट : १५ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२५
ऑक्टोबरच्या उर्वरित दिवसांमध्ये (१५ ते ३१ ऑक्टोबर) देशभरातील विविध राज्यांमध्ये असणाऱ्या सुट्ट्यांची एकत्रित यादी खालीलप्रमाणे आहे. (लक्षात घ्या की, ही यादी सर्व राज्यांसाठी एकत्रित आहे, तुमच्या राज्यात त्या दिवशी सुट्टी नसेल.)
महाराष्ट्र बँक हॉलिडे लिस्ट : १५ ते ३१ ऑक्टोबर २०२५
- १९ ऑक्टोबर, रविवार: साप्ताहिक सुट्टी (देशव्यापी)
- २१ ऑक्टोबर, मंगळवार: दिवाळी (अमावस्या) आणि लक्ष्मी पूजन (स्थानिक सुट्टी)
- २२ ऑक्टोबर, बुधवार: दिवाळी पाडवा, विक्रम संवत नवीन वर्ष आणि बलि प्रतिपदा (स्थानिक सुट्टी)
- २५ ऑक्टोबर, शनिवार: चौथा शनिवार (मासिक सुट्टी/देशव्यापी)
- २६ ऑक्टोबर, रविवार: साप्ताहिक सुट्टी (देशव्यापी)
बँक हॉलिडे लिस्ट: १५ ते ३१ ऑक्टोबर २०२५ (देशव्यापी आणि प्रादेशिक सुट्ट्या) १५ ऑक्टोबर, बुधवार: (बँक कामकाजाचा दिवस)
- १६ ऑक्टोबर, गुरुवार: (बँक कामकाजाचा दिवस)
- १७ ऑक्टोबर, शुक्रवार: (बँक कामकाजाचा दिवस)
- १८ ऑक्टोबर, शुक्रवार: काती बिहू (आसाममध्ये बँका बंद)
- १९ ऑक्टोबर, शनिवार: रविवार (साप्ताहिक सुट्टी - देशव्यापी)
- २० ऑक्टोबर, सोमवार: दिवाळी, नरक चतुर्दशी, काली पूजा (महाराष्ट्र वगळता बहुतांश राज्यांत बँका बंद)
- २१ ऑक्टोबर, मंगळवार: दिवाळी अमावस्या, लक्ष्मी पूजन, गोवर्धन पूजा (महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, सिक्कीम, मणिपूर, जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद)
- २२ ऑक्टोबर, बुधवार: दिवाळी, विक्रम संवत नवीन वर्ष, गोवर्धन पूजा (महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, उत्तराखंड, सिक्कीम, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये बँका बंद)
- २३ ऑक्टोबर, गुरुवार: भाई दूज, चित्रगुप्त जयंती (गुजरात, सिक्कीम, मणिपूर, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशमध्ये बँका बंद)
- २४ ऑक्टोबर, शुक्रवार: (बँक कामकाजाचा दिवस)
- २५ ऑक्टोबर, शनिवार: चौथा शनिवार (देशव्यापी सुट्टी)
- २६ ऑक्टोबर, रविवार: रविवार (साप्ताहिक सुट्टी - देशव्यापी)
महत्त्वाची टीप: या सर्व सुट्ट्यांदरम्यान ऑनलाइन बँकिंग, एटीएम आणि यूपीआय सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील. त्यामुळे पैशांचे व्यवहार आणि इतर डिजिटल कामे सहज करता येतील.
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!








Click it and Unblock the Notifications