Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Crude Oil Price : कच्च्या तेलाचा भडका! 100 डॉलर्सचा टप्पा पार; पेट्रोल-डीझेल महागणार का? वाचा अपडेट

Crude oil price hike impact on petrol diesel rates : मध्य-पूर्वेतील इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या संघर्षाचा थेट फटका आता भारतीय ग्राहकांच्या खिशाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत मोठी वाढ झाली असून, दराने १०० USD प्रति बॅरलचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या ४ वर्षांतील ही सर्वात मोठी दरवाढ मानली जात आहे.

Crude Oil Price


युद्धाचा परिणाम आणि तज्ज्ञांचा इशारा

मिडिल ईस्टमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी कच्चे तेल प्रति बॅरल ६२ डॉलर्सच्या आसपास होते, मात्र अवघ्या आठवडाभरात या किमती ९० डॉलर्सच्या पुढे गेल्या आणि आता १०० डॉलर्सवर पोहोचल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही हे युद्ध लांबण्याची शक्यता वर्तवली आहे, ज्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत 'बेसुमार' वाढ होऊ शकते.

तेल कंपन्यांचा ५ ते ७ रुपयांच्या दरवाढीचा प्रस्ताव?

भारत आपल्या गरजेच्या ३० ते ५० टक्के कच्चे तेल थेट मध्य-पूर्व देशांकडून खरेदी करतो. जर आंतरराष्ट्रीय बाजारात किमती ९५ डॉलर्सच्या वर स्थिर राहिल्या, तर भारतीय तेल कंपन्यांवर दबाव वाढेल. अशा परिस्थितीत तेल कंपन्या ५ ते ७ रुपये प्रति लिटर दरवाढीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे ठेवू शकतात. सध्या सरकारने परिस्थितीवर लक्ष असल्याचे सांगत 'घाबरण्याचे कारण नाही' असे स्पष्ट केले असले तरी, तज्ज्ञांच्या मते दरवाढ अटळ ठरू शकते.

प्रमुख शहरांतील आजचे इंधन दर (९ मार्च २०२६)

मुंबई:

  • पेट्रोल: ₹१०४.२१
  • डीझेल: ₹९२.१५

पुणे:

  • पेट्रोल: ₹१०४.०४
  • डीझेल: ₹९०.५७

नाशिक:

  • पेट्रोल: ₹९५.५०
  • डीझेल: ₹८९.५०

बेंगळुरू:

  • पेट्रोल: ₹१०२.९२
  • डीझेल: ₹८९.०२

नवी दिल्ली:

  • पेट्रोल: ₹९४.७२
  • डीझेल: ₹८७.६२

हैदराबाद:

  • पेट्रोल: ₹१०७.४६
  • डीझेल: ₹९५.७०

तेल कंपन्यांचा प्रस्ताव कसा असेल?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे तेल विपणन कंपन्यांच्या 'अंडर-रिकव्हरी'मध्ये वाढ होते. मे २०२२ पासून भारतात इंधन दर स्थिर आहेत. जर कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलर्सच्या वर राहिल्या, तर कंपन्यांचा तोटा भरून काढण्यासाठी तुलनात्मक दरवाढ आवश्यक ठरेल. कंपन्या सुरुवातीला टप्प्याटप्प्याने किंवा थेट एकरकमी ५ ते ७ रुपयांच्या वाढीची शिफारस करू शकतात.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+