अर्थसंकल्पात बिहारवर विशेष फोकस, जाणून घ्या- बिहारसाठी काय काय मिळालं, वाचा A टू Z माहिती
Budget 2025 for Bihar : बिहारमध्ये यावर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात बिहारसाठी अनेक आकर्षक घोषणा केल्या जातील असा अंदाज आधीच वर्तवला जात होता. आता या अंदाजाला खुद्द अर्थमंत्र्यांनीच दुजोरा दिला आहे. अर्थसंकल्प २०२५ मध्ये बिहार राज्यासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत त्यांचे आठवे बजेट सादर करत आहेत. सरकारचे लक्ष बिहारवर आहे, जिथे या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. अर्थसंकल्पात सीतारमण यांनी बिहारसाठी राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्याची घोषणा केली. यामुळे परिसरात अन्न प्रक्रियांना चालना मिळेल असे म्हटले जात आहे.

अर्थमंत्र्यांनी राज्यातील विद्यमान आयआयटीचा विस्तार करण्याची घोषणाही केली. तसेच राज्यात माखाना बोर्ड स्थापन करण्याची घोषणा केली. याचा फायदा मखाना पिकवणाऱ्या लहान शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना होईल.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बिहारमध्ये नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ बांधण्याची घोषणा केली आहे. पटणा आणि बिहटा विमानतळां व्यतिरिक्त अतिरिक्त विमानतळ बांधले जातील. त्यांनी बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन करण्याची घोषणा केली आहे. याद्वारे मखाना उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. अर्थमंत्र्यांनी सांगितले की यामुळे मखानाचे उत्पादन आणि प्रचार वाढेल.
अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा केली की मिथिला येथील पश्चिम कोसी कालवा प्रकल्पासाठी आर्थिक मदत दिली जाईल. यामुळे मिथिला प्रदेशातील 50 हजार हेक्टर क्षेत्रातील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होईल. त्यांना सिंचनाचे पाणी मिळेल.
याशिवाय, बिहारमध्ये राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था (फूड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट) स्थापन केली जाईल. अर्थमंत्र्यांनी सांगितले की यामुळे संपूर्ण पूर्वेकडील प्रदेशात अन्न प्रक्रिया उपक्रमांना चालना मिळेल. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि तरुणांना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आयआयटी पाटणा येथील वसतिगृहाची क्षमता वाढवली जाईल.
बिहारमधील कलाप्रकारची साडी नेसून दिला सन्मान
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या पोशाखातही सरकारच्या बिहारवरील लक्ष केंद्रित करण्याची झलक दिसून आली. अर्थसंकल्प सादर करण्यासाठी तिने बिहारची प्रसिद्ध मधुबनी साडी निवडली. सोनेरी किनार असलेली ही साडी पद्मश्री दुलारी देवी यांनी त्यांच्या शेवटच्या बिहार भेटीत भेट दिली होती.












Click it and Unblock the Notifications