ऐन लग्नसराईत फटका! अर्थसंकल्पात सोने-होऊ शकते महाग! जाणून घ्या 22 कॅरेट सोन्याचे भाव किती वाढणार?
Budget 2025 In Marathi gold silver Price : सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. जानेवारीच्या या 31 दिवशी सोन्याचा दर सुमारे 6 हजार रुपयांनी वाढला आहे. देशात पहिल्यांदाच सोन्याने 82 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. 31 जानेवारी रोजी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 82 हजारांच्यावर तर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 76 हजारांच्यावर आहे.
चांदीच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत 2025 च्या अर्थसंकल्पात सोन्या-चांदीचे दर आणखी वाढणार असल्याच्या बातम्या येत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

वाढू शकते सोन्यावर कस्टम ड्युटी!
इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्पात सोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटी वाढवण्याची घोषणा करू शकतात.
Budget 2025: सोन्याचा दर 4 ते 5 हजार रुपयांनी वाढू शकतो
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024 मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोन्यावरील कस्टम ड्युटी 15 टक्क्यांवरून 6 टक्क्यांपर्यंत घटवली होती. त्यानंतर सोन्याचा दर दहा ग्रॅममागे चार ते पाच हजार रुपयांनी घसरला होता. आता या निर्णयामुळे देशात सोन्याची आयात झपाट्याने वाढू लागली आहे.
अर्थसंकल्पापूर्वी सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याबाबत तज्ज्ञांचे मत आहे की, या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन सोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटी वाढवण्याची घोषणा करू शकतात. बजेटमध्ये कस्टम ड्युटी 6 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत वाढवली जाऊ शकते. असे झाल्यास सोन्याचा भाव प्रती 10 ग्रॅममागे 4 ते 5 हजार रुपयांनी वाढू शकतो. मात्र, दिल्ली विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सोन्याचे भाव वाढवण्याचा विचार करणार नसल्याचेही काही तज्ज्ञांचे मत आहे.
Budget 2025 silver rate : चांदी किती महाग होऊ शकते?
चांदीच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 30 दिवसांत चांदीची किंमत 85,900 रुपये प्रति किलोवरून 91,600 रुपये प्रति किलोपर्यंत वाढली आहे. अर्थसंकल्पानंतर चांदीचे दरही वाढू शकतात, असे बोलले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, सोन्या-चांदीच्या प्रोजेक्शनसाठी दोघांच्या गुणोत्तराची तुलना केली जाते. हे प्रमाण सामान्यतः 30 % ते 90 % दरम्यान राहते. सध्या सोने आणि चांदीचे प्रमाण 89.3% आहे. अशा परिस्थितीत आता तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, येत्या काळात हे प्रमाण आणखी घसरेल, त्यामुळे सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. चांदी 1 लाख रुपये प्रति किलोच्या पुढे जाऊ शकते.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा











Click it and Unblock the Notifications