Budget 2025: अर्थसंकल्पात गॅस सिलेंडर स्वस्त होणार ? शेतकरी आणि महिलांवरही असणार नजर
Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी 2025 रोजी या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा हा आठवा अर्थसंकल्प असेल. हे बजेट बनवण्यामागे अनेक दिवसांचे प्रयत्न आणि एका टीमचे कठोर परिश्रम आहेत. त्याच वेळी, करदाते, शेतकरी, महिला आणि उद्योगातील भागधारकांसह विविध क्षेत्रातील लोक या अर्थसंकल्पाच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत.
या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींबाबत महत्त्वाच्या घोषणा अपेक्षित आहेत. दरम्यान याआधी 1 जानेवारी 2025 रोजी तेल आणि गॅस मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमती कमी केल्या होत्या.

फाईल फोटो सौजन्य- पीटीआय
एलपीजी अनुदानाच्या अपेक्षा
दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 14-16 रुपयांची कपात करण्यात आली. तसेच वर्षाच्या सुरुवातीला घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. दरम्यान पेट्रोलियम मंत्रालयाने सरकारकडे एलपीजी सबसिडीसाठी 40,000 कोटी रुपयांची तरतूद करण्याची विनंती केली आहे.
जर ही मागणी पूर्ण झाली तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड सारख्या कंपन्यांचे नुकसान भरून काढता येईल, असं तज्ज्ञांचे मत आहे. या निर्णयामुळे ग्राहकांसाठी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमती कमी होऊ शकतात.
सध्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 800 रुपयांपेक्षा जास्त आहे. अर्थसंकल्पात अनुदानात वाढ झाल्यास सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा मिळू शकतो. दरम्यान अर्थसंकल्प अधिकृतपणे सादर झाल्यानंतरच कोणताही अंतिम निर्णय घेतला जाईल.
19 किलो एलपीजी सिलिंडरच्या नवीन किमती 1 जानेवारी 2025 रोजी जाहीर करण्यात आल्या आहेत. दिल्लीत एका सिलेंडरची किंमत आता 1804 रुपये झाली आहे, जी 1 डिसेंबर रोजी 1818.50 रुपये होती, म्हणजेच 14.50 रुपयांची कपात झाली आहे. त्याचप्रमाणे कोलकातामध्ये ते प्रति सिलिंडर 1927 रुपयांवरून 1911 रुपयांवर आली आहे. मुंबईतही व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 15 रुपयांची घट झाली आहे. डिसेंबरमध्ये त्याची किंमत 1771 रुपये होती, तर आता त्याची किंमत 1756 रुपये आहे.












Click it and Unblock the Notifications