आज अर्थसंकल्प, रेल्वे प्रवाशांना मिळू शकते गुड न्यूज! ज्येष्ठांना तत्काळ तिकीटावर 50 सवलतीची अपेक्षा
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेसाठी मोठी तरतूद करण्याची अपेक्षा आहे. जर तुम्ही ट्रेन प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आली आहे. भारतीय रेल्वे लवकरच ज्येष्ठ नागरिकांना आनंदाची बातमी देऊ शकते.
जेष्ठांना मिळू शकतो हा लाभ
कोविड-19 महामारीचा उद्रेक होण्यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटांवर 50 टक्के सवलत दिली जात होती. पण कोविड महामारीच्या काळात रेल्वेने ही सुविधा देणे बंद केले होते. आता ही आशा पुन्हा एकदा अर्थसंकल्पामुळे पल्लवित झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांना तत्काळ तिकीटावर ५० टक्के सवलतीची अपेक्षा या अर्थसंकल्पातून मिळण्याची शक्यता आहे.

आधी दिली जात होती सुविधा
तत्काळ तिकीटावर 50 टक्के सवलतीची सुविधा 31 डिसेंबर 2019 पर्यंत देण्यात येत होती.. या अंतर्गत दुरांतो, शताब्दी, जनशताब्दी, राजधानी, मेल आणि एक्स्प्रेस यासारख्या विविध गाड्यांच्या भाड्यात 60 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिक आणि 58 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या महिलांसाठी लक्षणीय सवलत देण्यात येत होती.
कोविडमुळे ही सुविधा बंद झाली होती. देशाचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर होणार आहे. त्यामुळे यासंदर्भात अर्थमंत्री घोषणा करण्याची शक्यता आहे
आजारी प्रवाशांनाही मिळते सुट
रेल्वेच्या अर्थसंकल्पात अतिरिक्त खर्च होणार आहे, सरकार आगामी केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये रेल्वेवर अतिरिक्त खर्च करणार आहे, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के सवलत मिळण्याची शक्यता आहे. जे नागरिक कोणत्याही विशिष्ट आजाराने त्रस्त असतील त्यांचा प्रवास सुलभ करण्यासाठी, रेल्वे तिकिटांवर 50 टक्के ते 100 टक्क्यांपर्यंत विशेष सूट दिली जाते.
या व्याधीग्रस्तांना रेल्वेकडून सुट
या यादीमध्ये रुग्ण आणि अपंग लोकांचा समावेश आहे जे 100 टक्क्यांपर्यंत सूट मिळवू शकतात. या विशेष आजारांमध्ये कर्करोग, थॅलेसेमिया, टीबी, एड्स, ॲनिमिया, हिमोफिलिया यांचाही समावेश होतो. याशिवाय हृदय शस्त्रक्रियेसाठी जाणारे रुग्ण, किडनीचे रुग्ण, ऑपरेशन किंवा डायलिसिससाठी जाणारे रुग्ण, कुष्ठरोगाने त्रस्त असलेल्यांना रेल्वे तिकिटात सवलत दिली जाते. यासाठी रुग्णांनी त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करणेही आवश्यक आहे.
रेल्वेची कनेक्टीव्हीटी सुधारली - प्रवासी
#WATCH | Howrah, WB: Finance Minister Nirmala Sitharaman will present the Union Budget today.
— ANI (@ANI) July 23, 2024
Amit Sharma, a local says "We are expecting the budget to be better than the previous year. The tax slab should be revised by the govt. We expect the prices of petrol and LPG to be… pic.twitter.com/DT3heSByyx
अमित शर्मा, सांगतात, "अर्थसंकल्प मागील वर्षाच्या तुलनेत चांगला असण्याची अपेक्षा आहे. सरकारने कर स्लॅबमध्ये सुधारणा करावी. आम्हाला पेट्रोल आणि एलपीजीच्या किमती कमी होण्याची अपेक्षा आहे. रेल्वेची कनेक्टिव्हिटी सुधारली आहे. गेली 5-10 वर्षे हे असेच चालू राहिले पाहिजे..."
महाराष्ट्रातील 'रेल्वे'ला ही अपेक्षा
अनेक मीडियांच्या वृत्तानुसार, यावेळी अर्थसंकल्पात रेल्वेशी संबंधित इतरही अनेक घोषणाही होणार आहेत. यात रेल्वेचे जाळे विकसित करणे आणि नवीन गाड्या सुरू करणे याही अपेक्षा आहेत.विशेष म्हणजे महाराष्ट्रातील लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रश्न तसेच विद्युतीकरणाचा प्रश्न प्रलंबित असून या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मोठी आशा आहे. तसेच काही नवीन गाड्यांचीही महाराष्ट्राला अपेक्षा आहे. मुंबईच्या लोकल सेवेला अधिक गती देण्यासाठीही या अर्थसंकल्पाकडून आशा आहे.
-
अशोक खरातचा 'खेळ' खल्लास? एसआयटीच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications