Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा! तरुणांना पहिल्या नोकरीवर सरकार देणार 15 हजार रुपये!

बजेट 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत मोठी घोषणा केली आहे. सरकार पहिल्यांदा नोकरीवर लागलेल्या पंधरा हजार रुपये देणार आहे. एक लाखाच्या आत ज्यांचा पगार असेल त्या नवीन नोकरी मिळालेल्या व्यक्तींसाठी ही योजना आहे.

कोण पात्र आहे?

"ही योजना सर्व औपचारिक क्षेत्रांमध्ये नव्याने काम करणाऱ्या सर्व व्यक्तींना एक महिन्याचे वेतन देईल," असे त्या म्हणाल्या. सीतारामन यांनी स्पष्ट केले की, एका महिन्याच्या पगाराचे थेट लाभ हस्तांतरण 15 हजारांपर्यंत, तीन हप्त्यांमध्ये प्रदान केले जाईल. या फायद्यासाठी पात्रता मर्यादा 1 लाख रुपये प्रति महिना पगार असेल. हा लाभ मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.

Budget 2024  Nirmala Sitharaman announcement

उत्पादन क्षेत्रातील फ्रेशर्ससाठी

मॅन्युफॅक्चरिंग स्कीममध्ये रोजगार निर्मितीबाबत बोलताना त्या म्हणाल्या, या योजनेमुळे उत्पादन क्षेत्रातील अतिरिक्त रोजगारांना प्रोत्साहन मिळेल, जे पहिल्यांदा काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रोजगाराशी निगडीत आहे. रोजगाराच्या पहिल्या 4 वर्षांमध्ये EPFO ​​योगदानाच्या संदर्भात कर्मचारी आणि नियोक्ता दोघांनाही विशिष्ट प्रमाणात प्रोत्साहन दिले जाईल," सीतारामन म्हणाले. अर्थात प्रथमच नोकरी शोधणाऱ्यांसाठी 1 लाख रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या लोकांना तीन हप्त्यांमध्ये 15,000 रुपयांची मदत मिळेल.

सीतारामन यांनी नव्याने नोकरी करणाऱ्यांसाठी योजना जाहीर केली. "ही नियोक्ता-केंद्रित योजना सर्व क्षेत्रातील अतिरिक्त रोजगार कव्हर करेल. 1 लाख रुपये प्रति महिना पगाराच्या आत सर्व अतिरिक्त रोजगार मोजला जाईल. प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यासाठी EPFO ​​योगदानासाठी सरकार नियोक्त्यांना दरमहा 3,000 रुपये प्रति महिना भरपाई देण्यात येईल.

अर्थमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेमुळे 50 लाख लोकांना अतिरिक्त रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. ज्यांना सरकारी योजनांतर्गत कोणताही लाभ मिळत नाही, त्यांना देशभरातील संस्थांमध्ये प्रवेशासाठी कर्ज मिळेल. सरकार कर्जाच्या 3 टक्के रक्कम देईल. यासाठी ई-व्हाऊचर सुरू करण्यात येणार असून ते दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+