Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Bank holiday mahashivratri 2025 : महाशिवरात्रीला बँका कुठे बंद राहणार? 26 फेब्रुवारीला येथे सुट्टी

Bank holiday mahashivratri 2025 : RBI वेगवेगळ्या सण आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी बँकांना सुटी देते. यावेळी 2025 चा महाशिवरात्री हा सण 26 फेब्रुवारीला साजरा केला जाणार आहे आणि अशा परिस्थितीत आरबीआयने अनेक ठिकाणी बँकांना सुट्टी दिली आहे. जर तुम्हाला 26 फेब्रुवारीला बँकेशी संबंधित काम करायचे असेल तर तुमच्या शहरातील बँका बंद आहेत की उघड्या राहणार आहेत हे नक्की पहावे लागेल.

Bank holiday mahashivratri 2025

Bank Holiday mahashivratri 2025 निमित्त या ठिकाणी बँका बंद राहणार..

देशभरात अनेक लोक महाशिवरात्रीचा सण साजरा करतात. अनेक राज्यांतील शाळा आणि महाविद्यालयांनाही या दिवशी सुट्टी असते. या उत्सवात लोक प्रामुख्याने भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा करतात. शिवरात्री 2025 निमित्त, आरबीआयने गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, चंदीगड, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, जम्मू-श्रीनगर, केरळ, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि हिमाचल प्रदेशमधील बँकांना सुट्टी जाहीर केली आहे.

28 फेब्रुवारीला कुठे असेल सुटी?

(28 फेब्रुवारी बँक हॉलिडे) 28 फेब्रुवारी रोजी लोसारच्या निमित्ताने सिक्कीम (गंगटोक) मध्ये सरकारी आणि खाजगी दोन्ही बँका बंद राहतील. फेब्रुवारी महिन्यात अनेक दिवस बँका बंद होत्या. यात सण आणि शनिवार-रविवार यांचाही समावेश आहे. 3 फेब्रुवारीला सरस्वती पूजनामुळे बँकेला सुट्टी होती. याशिवाय विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी 5 फेब्रुवारीला दिल्लीत सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा : MahaShivratri 2025: पैशाची कमतरता आहे..? यंदाच्या महाशिवरात्रीला करा 'हे' सात उपाय

8 फेब्रुवारीला महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने दिल्लीसह संपूर्ण देशात बँका बंद होत्या. याशिवाय 9 फेब्रुवारी रविवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी होती. त्याचवेळी 16 फेब्रुवारीला रविवार असल्याने देशभरातील बँका बंद होत्या. याशिवाय 22 फेब्रुवारी 2025 रोजी महिन्यातील चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी होती.

बँकेशी संबंधित काम अशा प्रकारे सोडवा

जर तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असेल तर त्यासाठी तुम्ही बँकेच्या वेबसाइट किंवा ॲपची मदत घेऊ शकता. या सुट्ट्या असूनही तुम्ही एटीएमच्या मदतीने पैसे काढू शकता. याशिवाय तुम्ही UPI देखील वापरू शकता. बँकेच्या या सेवांवर सुट्टीचा कोणताही परिणाम होणार नाही. बँकेच्या सुट्ट्या लक्षात घेऊन तुमच्या बँकेशी संबंधित कामाचे नियोजन करा, अन्यथा तुमचे बँकेचे महत्त्वाचे काम बंद पडू शकते आणि तुम्हाला नंतर अडचणी येऊ शकतात.

हेही वाचा : Mahashivratri 2025 : भगवान शिवाचे आवडते बेलपत्राचे अनेक आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+