FD करणाऱ्यांसाठी खूशखबर! 5 ते 6 टक्के विसरा; आता पैसे फिक्स करा 'या' बँका देत आहेत 8.30 टक्के व्याज
Bank FD Rates : सामान्य माणूस पै-पै जमा करतो ..कशासाठी तर भविष्य सुखकर करण्यासाठी, गुंतवणूक ही चांगली गोष्ट आहे पण ती जेवढी मोठी असेल तेवढी जोखिम त्या काळात कमी असते. म्हणूनच एफडीचा पर्याय अनेकांना सोपा वाटतो. एफडी म्हणजेच फिक्स डिपाॅझिट करुन पैशावर पैसा अनेकजण कमवत आहेतच आणि तो सुरक्षितही राहत आहे.
एफडी करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आता समोर आली आहे. जर तुम्हीही तुमचे पैसे सुरक्षित मार्गाने वाढवण्याचा विचार करत असाल, तर फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. देशातील अनेक मोठ्या बँका एफडीवर उत्तम व्याजदर देत आहेत, जी गुंतवणूकदारांसाठी चांगली बातमी आहे. काही बँका ज्येष्ठ नागरिकांना ८.३० टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत.

कोणत्या बँकेत किती मिळत आहे व्याजदर?
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
सामान्य ग्राहक ३ टक्क ते ७.१० टक्के, ज्येष्ठ नागरिक ३.५० टक्के ते ७.६० टक्के
एचडीएफसी बँक
सामान्य ग्राहक ३% ते ७.२५%
ज्येष्ठ नागरिक ३.५०% ते ७.७५%
आयसीआयसीआय बँक
सामान्य ग्राहक ३% ते ७.१०%
ज्येष्ठ नागरिक ३.५०% ते ७.६०%
आरबीएल बँक
सध्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडीवर सर्वाधिक व्याजदर देत आहे: सामान्य ग्राहकांसाठी ३.५०% ते ७.८०%
ज्येष्ठ नागरिकांसाठी ४% ते ८.३०% जर तुम्ही जास्त परतावा शोधत असाल तर ही बँक तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकते.
आयडीबीआय बँक
सामान्य ग्राहक ३% ते ६.७५%
ज्येष्ठ नागरिक ३.५०% ते ७.२५%
कोटक महिंद्रा बँक
सामान्य ग्राहक २.७५% ते ७.२०%
ज्येष्ठ नागरिक ३.२५% ते ७.७०%
पंजाब नॅशनल बँक (पीएनबी)
सामान्य ग्राहक ३.५०% ते ७.२५%
ज्येष्ठ नागरिक ४% ते ७.७५%
कॅनरा बँक
सामान्य ग्राहक ४% ते ७.२५%
ज्येष्ठ नागरिक ४% ते ७.७५%
अॅक्सिस बँक
सामान्य ग्राहक ३.५०% ते ७.१०%
ज्येष्ठ नागरीक ३.५०% ते ७.८५%
बँक ऑफ बडोदा
सामान्य ग्राहक ३% ते ७.०५%
ज्येष्ठ नागरिक ३.५०% ते ७.५५%
एफडी गुंतवणुकीचे फायदे काय?
हमी परतावा ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त व्याज भांडवल सुरक्षित राहते कर बचत पर्याय देखील उपलब्ध आहे गुंतवणूक करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा.
- व्याजदर कालांतराने बदलू शकतात.
- एफडीच्या कालावधीनुसार वेळोवेळी व्याज बदलू शकते.
- लवकर एफडी मोडल्यास दंड होऊ शकतो.
बँक वेबसाइट, शाखेतून योग्य व्याजदर तपासा
वाढत्या महागाईच्या काळात, एफडी हा एक सुरक्षित आणि स्थिर गुंतवणूक पर्याय आहे. जर तुम्हाला जोखीम टाळून परतावा मिळवायचा असेल, तर एफडीसाठी ही योग्य वेळ आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक उत्तम संधी आहे, जिथे ८.३० टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकते.












Click it and Unblock the Notifications