पुणे आणि नोएडा येथे नवीन अॅपल स्टोअर्स उघडणार, कंपनीने लोकेशन केले फायनल
अॅपल भारतात आपले रिटेल नेटवर्क वाढवण्याच्या योजनांवर वेगाने काम करत आहे. एका रिपोर्टनुसार कंपनीने भारतातील तिसऱ्या आणि चौथ्या अधिकृत स्टोअरसाठी ठिकाणे अंतिम केली आहेत. तिसरे स्टोअर डीएलएफ मॉल ऑफ इंडिया नोएडा येथे उघडले जाईल. तर चौथे अॅपल स्टोअर पुण्यातील कोपा मॉल येथे उघडले जाणार आहे.
भारतात अॅपल स्टोअर्सचा विस्तार
भारतात सध्या दोन अधिकृत अॅपल स्टोअर्स आहेत. एक दिल्लीतील सिलेक्ट सिटीवॉक मॉलमध्ये आहे तर दुसरे मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे आहे. पहिल्या वर्षी दोन्ही स्टोअर्सनी 800 कोटी रुपयांचा महसूल जमवला आह, ज्यात अॅपल साकेतने लहान आकार असूनही 60 टक्के योगदान दिले आहे. त्यामुळे कंपनी हा विस्तार करण्यात येत आहे.

अॅपल स्टोअर्ससाठी लोकेशन फायनल
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, अॅपल त्यांच्या रिटेल विस्ताराच्या दुसऱ्या टप्प्यात पुण्यातील कोपा मॉलमध्ये आणखी एक स्टोअर उघडण्याची तयारी करत आहे. अॅपलने पुणे आणि नोएडामधील ठिकाणे आधीच निश्चित केली आहेत आणि आता ते बंगळुरू आणि मुंबईमध्ये आणखी दोन ठिकाणे शोधत आहेत. गेल्या महिन्यात लिंक्डइनवर काही नोकरीच्या पोस्ट पाहिल्या गेल्या तेव्हा ही माहिती समोर आली. रिपोर्टनुसार, एकूण 20 रिक्त पदांपैकी 8 रिक्त पदे अॅपल रिटेलशी संबंधित होती, ज्यावरून स्पष्ट होते की कंपनी भारतात आपला विस्तार वाढवण्याची योजना आखत आहे.
अॅपलचे रिटेल विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष, डियर्ड्रे ओ'ब्रायन यांनी ऑक्टोबर 2024 मध्ये कंपनीच्या विस्तार योजनांची घोषणा केली होती. त्यानंतर लवकरच कंपनीने भारतात आपल्या आगामी कामकाजाचा विस्तार करण्यासाठी सुमारे 400 कर्मचाऱ्यांची भरती करण्यास सुरुवात केली. अॅपलच्या सध्याच्या सिलेक्ट सिटीवॉक मॉल आणि बीकेसी स्टोअर्समध्ये अंदाजे 90-100 कर्मचारी आहेत आणि कंपनी बंगळुरू, पुणे, दिल्ली-एनसीआर आणि मुंबई येथील भविष्यातील स्टोअर्ससाठी अशाच प्रकारच्या भरतीची योजना आखत असल्याचा अंदाज आहे.












Click it and Unblock the Notifications