अदानी टोटल गॅस लिमिटेड आणि जिओ-बीपी यांच्यात भागीदारी; ग्राहकांना दर्जेदार इंधन सेवा देण्याचा संकल्प
भारतातील इंधन सेवा अनुभव अधिक दर्जेदार आणि व्यापक करण्याच्या उद्देशाने अदानी टोटल गॅस लिमिटेड (ATGL) आणि जिओ-बीपी (Reliance BP Mobility Limited चा ब्रँड) यांच्यात एक महत्त्वपूर्ण करार झाला आहे. या भागीदारीअंतर्गत दोन्ही कंपन्या त्यांच्या मजबुतींचा उपयोग करून भारतीय ग्राहकांना उच्च गुणवत्तेचे इंधन पुरवण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहेत.

या सहकार्यामुळे काही ATGL इंधन केंद्रांवर जिओ-बीपीचे उच्च-कार्यक्षमतेचे पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्याचवेळी, काही जिओ-बीपी केंद्रांवर ATGL चे CNG वितरण युनिट्स स्थापित केले जातील - हे सर्व ATGL च्या अधिकृत भौगोलिक क्षेत्रांमध्ये (GA) राबवले जाईल. यामुळे वाहतूक क्षेत्रातील ग्राहकांसाठी दर्जेदार आणि इंधनाचे विस्तृत पर्याय उपलब्ध होतील.
ATGL ही अदानी आणि टोटलएनर्जीज यांची संयुक्त भागीदारी असून, भारतातील आघाडीची सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन (CGD) कंपनी आहे. ही कंपनी घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक ग्राहक आणि वाहनचालकांना नैसर्गिक वायू पुरवते. तसेच, कंप्रेस्ड बायोगॅस (CBG), इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग, आणि वाहतुकीसाठी LNG यासारख्या सेवा देखील ATGL पुरवते.
जिओ-बीपी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि bp यांची संयुक्त कंपनी आहे. ती भारतात इंधन विक्री, कमी-कार्बन उपाय आणि आधुनिक सोयीसुविधा असलेल्या रिटेल स्टोअर्सच्या क्षेत्रात कार्यरत असून मोबिलिटी सोल्युशन्स पुरवण्याच्या क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे.
सार्थक बेहुरिया, अध्यक्ष, जिओ-बीपी म्हणाले, आमच्या ग्राहकांना उत्कृष्ट दर्जाचे इंधन देण्याच्या समान दृष्टिकोनाने आम्ही एकत्र आलो आहोत. जिओ-बीपीने नेहमीच उत्तम ग्राहक अनुभव देण्यावर भर दिला आहे आणि ही भागीदारी आम्हाला परस्पर ताकद वापरून आणखी चांगले मूल्य देण्याची संधी देते.
सुरेश पी. मंगलानी, कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, अदानी टोटल गॅस लिमिटेड म्हणाले,
आमचे लक्ष्य म्हणजे आमच्या केंद्रांवर इंधनाचा संपूर्ण दर्जेदार पर्याय उपलब्ध करून देणे. ही भागीदारी आमच्या दोघांच्या पायाभूत सुविधांचा उपयोग करून ग्राहकांसाठी अनुभव आणि सेवा सुधारण्यात मदत करेल.
हा करार सध्याचे आणि भविष्यातील दोन्ही केंद्रांवर लागू होणार आहे. ATGL सध्या सुमारे 650 CNG स्टेशन्सचे नेटवर्क चालवते, तर जिओ-बीपीचे सुमारे 2000 इंधन केंद्रांचे जाळे आहे. ही भागीदारी दोन्ही कंपन्यांच्या शाश्वत वाढ आणि नवोन्मेषाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.












Click it and Unblock the Notifications