'ती' एक बातमी आणि अदानी शेअर्स धावले सुस्साट; पहा काय होते कारण...
Adani shares improved- अमेरिकेतल्या लाचखोरीच्या आरोपानंतर अदानी समुहाच्या शेअर्समध्ये प्रचंड घसरण झाली होती. मात्र आज एक बातमी आली आणि त्यानंतर अदानी समुहाचे शेअर्स सुस्साट सुटले. आज अदानी समुहाच्या सर्व शेअर्समध्ये प्रचंड तेजी दिसून आली.

शेअर्सच्या तेजीसाठी हे होते कारण
गौतम अदानी, सागर अदानी यांची एफसीपीए अरोपांमध्ये नावे नाहीत, असा दावा काल अदानी ग्रीनकडून करण्यात आला होता. आज माजी अटाँनी जनरल मुकूल रोहितगी यांनी अदानी समुहाचा बचाव केला. ते म्हणाले, अमेरिकेत जे आरोप आहेत. त्यापैकी फक्त एक आणि पाच नंबरचा आरोपच महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे या दोन्ही आरोपांमध्ये गौतम अदानी किंवा सागर अदानी यांचे नाव नाही. हे दोघे सोडून अन्य लोकांवर ते आरोप आहेत. केवळ एज्योर व सीडीएक्यू लोकांवरच लाचखोरीचा आरोप करण्यात आला आहे. रोहतगी यांच्या याच बातमीनंतर अदानी समुहाचे शेअर्स सुस्साट धावले, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
अदीनी समुहाचे शेअर्स वधारले
अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा शेअर्स 2.47 टक्क्यांनी वधारून तो 920.75 रुपायंवर पोहोचला. अदानी एंटरप्रायजेसचा शेअर्स 3.39 टक्क्यांनी वधारुन तो 2,223.40 रुपयांवर पोहोचला. तर अदानी एनर्जी सोल्युशन्सचा शेअर्स 5.95 टक्क्यांनी वधारून तो थेट 623.50 रुपयांवर पोहोचला. तर दुसरीकडे अदानी टोटल गॅस लिमिटेड 4.54 टक्के, अदानी स्पोर्ट्स 1.46 टक्के, अदानी विल्मर 2.26 टक्के, अंबुजा सिमेंट 1.20 टक्के, अदानी पाँवर 5.29 टक्के, सांघी इंडस्ट्रीज 1.15 टक्के, एसीसी 1.27 टक्के आणि एनडीटीव्ही 3.05 टक्क्यांनी वधारले.












Click it and Unblock the Notifications