Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Aaj Sone chadi che bhav : नागपंचमीच्या दिवशी आज सोन्याचे भाव गडगडले! जाणून घ्या ताजे दर

Aaj Sone chadi che bhav : श्रावण महिन्यात सोने आणि चांदीच्या किमतीतील चढ-उतार सुरूच आहेत. काल श्रावण सोमवारी २८ जुलै २०२५ रोजी सोन्याचे भाव घसरल्यानंतर आजही मंगळवारी २९ जुलैला सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळ सोने खरेदीपुर्वी ताजे दर जाणून घेणे महत्वाचे आहे.

सोने हे सदा-सर्वकाळ गुंतवणुकीचे मोठे साधन आहे. सोन्याने एकाच वर्षात तीस टक्के परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. त्यामुळे सोन्याचा मागील इतिहास पाहता सोन आगामी काळातही वाढणार असल्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. असे असतानाच आज सोन्याचे भाव मात्र घसरल्याचे चित्र आहे. आज दिल्ली ते मुंबईसह इतर शहरातील सोन्याचे ताजे दर जाणून घेऊया.

Aaj Sone chadi che bhav

आज २९ जुलै २०२५ रोजी सोन्याचे दर काय आहेत?

आज २९ जुलै २०२५ रोजी दिल्लीसारख्या प्रमुख शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव अजूनही ₹ १ लाख रुपये प्रति १० ग्रॅमच्या आसपास आहे. मुंबई आणि चेन्नईमध्ये सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ₹ ९९,९०० च्या आसपास आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ९१,७४० रुपये आहे. त्याच वेळी, २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,००,०७० आहे. मुंबई आणि कोलकातामध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ९९,९२० रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर ९२,५४० रुपयांच्या पुढे गेला आहे. पुण्यात आज सोन्याचा भाव २४ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम ₹९,९८२, २२ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम ₹९,१५० आणि १८ कॅरेट सोन्यासाठी (ज्याला ९९९ सोने असेही म्हणतात) ₹७,४८७ आहे.

आज भारतात २९ जुलै २०२५ रोजी चांदीची किंमत किती आहे?

आज चांदीच्या किमतीत कोणताही बदल दिसून आलेला नाही. आज चांदीचा दर प्रति किलो १ लाख १५ हजार ९०० रुपये स्थिर आहे.

२९ जुलै २०२५ रोजी विविध शहरांमध्ये सोन्याचा दर काय आहे?

दिल्ली:

२२ कॅरेट सोने: ₹९१,७४० प्रति १० ग्रॅम

२४ कॅरेट सोने: ₹१,००,०७० प्रति १० ग्रॅम

मुंबई आणि कोलकाता:

२२ कॅरेट सोने: ₹९२,५४० प्रति १० ग्रॅम

२४ कॅरेट सोने: ₹९९,९२० प्रति १० ग्रॅम

पुणे:

२२ कॅरेट सोने : ₹९,१५० प्रति ग्रॅम
२४ कॅरेट सोने : ₹९,९८२, प्रति ग्रॅम

चेन्नई:

२२ कॅरेट सोने: ₹९१,५९० प्रति १० ग्रॅम

हैदराबाद आणि बंगळुरू:

२४ कॅरेट सोने: अनुक्रमे ₹९९,९३० आणि ₹९९,९२० प्रति १० ग्रॅम

नोएडा, गाझियाबाद आणि लखनऊ:

२२ कॅरेट सोने: ₹९१,७४० प्रति १० ग्रॅम

२४ कॅरेट सोने: ₹१,००,०७० प्रति १० ग्रॅम

जयपूर:

२२ कॅरेट सोने: ₹९१,७४० प्रति १० ग्रॅम

अहमदाबाद:

२२ कॅरेट सोने: ₹९१,६५० प्रति १० ग्रॅम

२४ कॅरेट सोने: ₹९९,९८० प्रति १० ग्रॅम

पटना:

२२ कॅरेट सोने: ₹९१,५९० प्रति १० ग्रॅम

सोन्याचे दर का घसरले?

  • सोन्याच्या आंतरराष्ट्रीय किमतीतील घसरणीमागे अमेरिका आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यातील नवीन व्यापार करार हे मुख्य कारण आहे. या करारानुसार, अमेरिकेने युरोपीयन वस्तूंवर १५% शुल्क लादण्याची घोषणा केली आहे.
  • त्याच वेळी, युरोपियन युनियनने अमेरिकन उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या करारामुळे जागतिक व्यापारात स्थिरता येण्याची अपेक्षा आहे.
  • गुंतवणूकदारांना असे वाटत आहे की आता बाजारात जोखीम कमी झाली आहे, त्यामुळे ते सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणूक पर्यायांमधून आपले पैसे काढून शेअर बाजारासारख्या अधिक धोकादायक परंतु जास्त परतावा देणाऱ्या क्षेत्रांकडे वळत आहेत.
  • परिणामी, सोन्याची मागणी कमी झाली आहे, ज्यामुळे त्याच्या किमतीवर परिणाम दिसून येत आहे. या घसरणीमुळे सोन्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी ही संधी आहे, तर सध्याच्या गुंतवणूकदारांनी बाजारातील बदलांवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+