Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Aadhar Card Loan : आधार कार्डच्या मदतीने तुम्हाला मिळेल 10 हजारांचे कर्ज, जाणून घ्या अर्ज कसा करावा

Aadhar Card Loan : कर्ज ही अशी गोष्ट आहे, ज्याची आयुष्यात कधी न् कधी कुणाला न् कुणाला गरज पडते. कर्ज जरी नसले तरीही हातउसने पैसे मग ते हजार रुपये असो की कोट्यवधि पैशांची गरज सर्वांनाच पडते. अशातच कर्ज मिळवताना अनेकांना नाकीनऊ येते तर काहींना तांत्रिक अडचणी येतात, अशावेळी आपल्याकडे फारसा पर्याय राहतोच असे नाही.

बँकाकडून कर्ज घेताना अनेक वेळा बँका वैयक्तिक कर्ज देण्यास उशीर करतात, परंतु आता तुम्हाला कर्ज मिळविण्यात अडचणी येणार नाहीत. तुम्ही तुमच्या आधार कार्डद्वारे वैयक्तिक कर्ज मिळवू शकता.जर तुम्हाला दहा हजार रुपयांचे कर्ज हवे असेल तर आधार कार्डच्या मदतीने तुम्ही कर्ज कसे मिळवू शकता? यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

Aadhar Card Loan

कर्जासाठी पात्रता, निकष काय आहेत?

जर तुम्ही आधार कार्डद्वारे कर्जासाठी अर्ज करत असाल तर तुमचे वय 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे.काही कर्ज कंपन्यांचे नियम थोडे वेगळे असू शकतात, अशा परिस्थितीत, तुम्ही वयाची पात्रता तपासल्यानंतर अर्ज करू शकता.

उत्पन्नाचा स्रोत काय आहे?

आधार कार्डद्वारे कर्ज मिळविण्यासाठी नियमित आणि स्थिर उत्पन्न आवश्यक आहे. अर्जदार पगारदार असो किंवा स्वयंरोजगार असो, आधार कार्डद्वारे कर्ज मिळू शकते. परंतु प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नानुसार व्याजदर बदलू शकतो.

क्रेडिट इतिहास (पत)

कर्ज कंपन्या अनेकदा तुमचा क्रेडिट इतिहास देखील पाहतात. (म्हणजे तुम्ही आधी कर्ज घेतले आहे की नाही, आणि तुम्ही ते वेळेवर परत केले आहे की नाही) काही कंपन्या कमी क्रेडिट इतिहास असलेल्या लोकांना देखील कर्ज देऊ शकतात.

बँक खात्याची माहिती

कर्ज घेणाऱ्याचे बँक खाते सक्रिय असणे आवश्यक आहे. हे खाते आधार कार्डशी जोडलेले असावे, जेणेकरून कर्जाची रक्कम थेट त्या खात्यात पाठवता येईल.

आधार कार्डद्वारे कर्जासाठी अर्ज कसा करावा?

  • सर्वप्रथम, तुम्ही ज्या बँकेतून कर्जासाठी अर्ज केला आहे त्या बँकेच्या वेबसाइट किंवा अॅपला भेट द्या.
  • नंतर कर्ज पात्रता तपासा.
  • याशिवाय, व्याजदर, शुल्क आणि परतफेडीच्या अटी देखील तपासा.
  • कंपनी किंवा बँकेचे वय, उत्पन्न इत्यादी पात्रता निकष देखील तपासा.
  • आता कागदपत्रे अपलोड करा.
  • यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला समाविष्ट आहे.
  • तुमच्या मोबाईल नंबरशी आधार कार्ड लिंक असल्याची खात्री करा. यानंतर केवायसी प्रक्रिया पूर्ण करा.
  • आता ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरून अर्ज करा.

तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही EMI कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुमचे हप्ते आधीच प्लॅन करू शकता. कागदपत्रे सादर केल्यानंतर, कर्ज मंजूर केले जाते आणि 24-48 तासांच्या आत रक्कम तुमच्या खात्यात जमा होते. तुम्हाला आधारद्वारे केवायसी देखील पूर्ण करावे लागेल. एकदा तुमची माहिती योग्यरित्या पडताळली गेली की, कर्ज मंजूर होते आणि पैसे थेट तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातील.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+