लगेच व्हायचंय श्रीमंत, तर 'हा' व्यवसाय तुमच्यासाठी
मुंबई: तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, आणि झटपट श्रीमंत व्हायचं असेल, तर आम्ही तुम्हाला एक व्यवसाय सुचविणार आहोत. हा व्यवसाय आहे, दोरा बनवण्याचा व्यवसाय. हा व्यवसाय दर महिन्याला कमी पैशात तुम्हाला चांगली कमाई करून देऊ शकतो. तुम्ही अगदी छोट्या जागेपासूनही सुरुवात करू शकता.
कोणताही व्यवासय करायचा म्हणजे त्याची बाजारपेठ तपासली पाहिजे. महाराष्ट्रात कोठेही जा, तुम्हाला तेथे दोरा विकत घेणारे सापडतील. धाग्याशिवाय कापड बनवता येत नाही. तुमच्या दोरा बनवण्याच्या व्यवसायासाठी योग्य जागा निवडणे ही तुमच्या व्यवसायाची पहिली सुरुवात आहे. त्यानंतर तुम्हाला कच्चा माल पुरवठादार शोधावे लागतील.

त्यानंतर तयार केलेला दोरा विकण्यासाठी तुम्हाला कारखाने किंवा व्यावसायिक शोधावे लागतील. याशिवाय धागा उत्पादनासाठी दर्जेदार मशीन खरेदी करणे आवश्यक आहे. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही हा व्यवसाय घरबसल्या चालवू शकता किंवा बाजारात एखादे छोटे दुकान उघडू शकता.
धाग्याचे प्रकार आणि कच्चा माल
बाजारात जरी, रेशीम, प्लास्टिक आणि सुती धागे असे अनेक प्रकारचे आहेत. प्रत्येक प्रकारच्या धाग्यासाठी स्टॅटिक फायबर, सूत, रेशीम किंवा सिंथेटिक फायबर यासारख्या कच्च्या मालाची आवश्यकता असते.
विशेष बाब म्हणजे कॉटन पॉलिमर, सिल्क धागा आणि नायलॉनच्या किमती बाजारात जास्त आहेत. आवश्यक उपकरणांमध्ये थ्रेड मेकिंग मशीन, थ्रेड रोलिंग मशीन आणि रील बनवण्याच्या मशीनचा समावेश आहे.
गुंतवणूक आणि परवाना
तुम्हाला हा व्यवसाय अल्प प्रमाणात सुरू करायचा असेल तर त्यासाठी परवाना आवश्यक नाही. पण तुमची मोठा व्यवसाय करण्याची कल्पना असेल, तर कायदेशीर परवाना आवश्यक आहे. या व्यवसायासाठी सुरुवातीची गुंतवणूक 5 ते 6 लाख रुपये आहे. एकदा व्यवसाय सुरु केल्यानंतर तुम्ही त्याचा अजून विस्तार करू शकता.
व्यवसाय सुरू करण्यापूर्वी...
व्यवासय सुरु करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या भागात कोणत्या दोऱ्याला जास्त मागणी आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यातून तु्म्हाला कोणत्या कच्चा मालावर आणि यंत्रसामग्रीमध्ये पैसे गुंतवायचेत, ते ठरवता येईल. हे सगळे तुम्हाला काळजीपूर्वक नियोजन करुन करावे लागेल. सगळे व्यवस्थित जमले तर तुम्ही दरमहा लाखो रुपये सहज कमवू शकता.












Click it and Unblock the Notifications