8th Pay Commission: 8वा वेतन लागू होताच वर्ग1 ते 10 पर्यंत, कोणाचा किती वाढेल पगार?, वाचा सविस्तर!
8th Pay Commission 2025 : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आठव्या वेतन आयोगाची (Eighth Pay Commission) आतुरतेने वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
सातवा वेतन आयोग 2016 पासून लागू असून, आता नवीन वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनात बदल अपेक्षित आहेत. हा वेतन आयोग पुढील वर्षी लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आठवा वेतन आयोग जेव्हापासून लागू होईल तेव्हापासून स्तरानुसार व श्रेणीनुसार कोणत्या कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होईल, याविषयी सविस्तर माहिती समोर आली आहे. जाणून घ्या त्याविषयी संपूर्ण गणित.

फिटमेंट फॅक्टर: पगाराची वाढ कशी निश्चित होते?
नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात नेमकी किती वाढ होईल, हे 'फिटमेंट फॅक्टर' (Fitment Factor) नावाच्या एका गुणकावर अवलंबून असते. हा गुणक मूळ पगाराचा गुणाकार करून नवीन पगार निश्चित करतो. सातव्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर २.५७ होता.
यामुळे, स्तर १ च्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार ₹७,००० वरून थेट ₹१८,००० पर्यंत वाढला होता. मूळ पगारासोबतच यामध्ये महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) आणि वाहतूक भत्ता (Transport Allowance) यांसारख्या इतर भत्त्यांचाही समावेश असतो. त्यामुळे, सातव्या वेतन आयोगानंतर, लेव्हल १ च्या कर्मचाऱ्यांचे एकूण पॅकेज सुमारे ₹३६,०२० झाले होते.
- स्तर - सध्याचा मूळ वेतन (₹) - अंदाजे नवीन मूळ वेतन (₹) - वाढ (₹)- उदाहरण पद/श्रेणी
- १ - १८,००० - ५१,४८० - ३३,४८० - शिपाई, परिचर, सहाय्यक कर्मचारी
- २ - १९,९०० ५६,९१४ ३७,०१४ - लोअर डिव्हिजन लिपिक (एलडीसी)
- ३ - २१,७०० - ६२,०६२ - ४०,३६२ - कॉन्स्टेबल, कुशल कर्मचारी
- ४ - २५,५०० - ७२,९३० -- ४७,४३० - ग्रेड ड स्टेनोग्राफर, कनिष्ठ लिपिक
- ५ - २९,२०० - ८३,५१२ -- ५४,३१२ - वरिष्ठ लिपिक, तांत्रिक कर्मचारी
- ६ - ३५,४०० - १,०१,२४४ -- ६५,८४४ - निरीक्षक, उपनिरीक्षक
- ७ - ४४,९०० - १,२८,४१४ -- ८३,५१४ - अधीक्षक, विभाग अधिकारी, सहाय्यक अभियंता
- ८ - ४७,६०० - १,३६,१३६ -- ८८,५३६ - वरिष्ठ विभाग अधिकारी, सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी
- ९ - ५३,१०० १,५१,८६६ --९८,७६६ - - डीएसपी, लेखा अधिकारी
- १० - ५६,१०० १,६०,४४६ --१,०४,३४६ - गट अ अधिकारी, नागरी सेवा प्रवेश पातळी
8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती पर्यंत वाढू शकतो?
अहवालांनुसार, आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.८६ पर्यंत वाढू शकतो. जर हे खरे ठरले, तर लेव्हल १ च्या कर्मचाऱ्यांचा सध्याचा मूळ पगार ₹१८,००० वरून थेट ₹५१,४८० पर्यंत वाढू शकतो.
ही वाढ केवळ स्तर १ च्या कर्मचाऱ्यांपुरतीच मर्यादित नसून, सर्व १० स्तरांमध्ये पगार आणि पेन्शनमध्येही वाढ होईल. या प्रचंड वेतनवाढीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि त्यांना मोठा दिलासा मिळेल.
-
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीची तयारी; मतदार यादी जाहीर, 'बिनविरोध'साठी हालचाली! -
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक











Click it and Unblock the Notifications