swami samarth prakat din : 'या' राशींसाठी स्वामी समर्थांची उपासना फलदायी ठरणार! प्रगटदिनी राहील कृपा
Swami samarth prakat din 2025 : चैत्र शुक्ल प्रतिपदा 31 मार्च 2025 गुढीपाडव्याच्या दिवसापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. या दिवसाच्या दुसऱ्याच दिवशी स्वामी समर्थ प्रगट दिन साजरा होत आहे.या दिवशी स्वामी समर्थांचा जन्म झाला होता. हा दिवस महाराष्ट्रातील स्वामी भक्त अत्यंत भक्तिभावाने साजरा करतात. स्वामी समर्थांची उपासनेला खूप महत्व स्वामींच्या भक्तांमध्ये असते, प्रगट दिनी आज जाणून घेऊया कोणत्या राशीवर स्वामी समर्थांची कृपा असेल.
मेष - आज गौरीतीज आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे. स्वतः मधले सामर्थ्य ओळखा आणि तेजाने सिद्ध व्हा. दिवस चांगला आणि शुभ जाईल.

वृषभ - कुटुंबीयांबरोबर धार्मिक कार्यक्रमात मध्ये दिवस व्यतीत कराल. गीत, संगीतात, कलेत वेळ घालवाल. आर्थिक आवक जावक मात्र चांगली राहील.
मिथुन - वाणीने वक्तृत्वाने समोरच्याला आपलेसे कराल, जोडीदारापासून भाग्यकारक घटना घडणार आहेत.
कर्क - शेती, बागायती मधून फायदा होईल. घरी जनावरे, गुरे असतील तर त्यांच्यावर आज विशेष प्रेम जाणवेल. दिवस सुखकारक असेल.
सिंह - समर्थांची उपासना आज विशेष फलदायी ठरेल. आज त्यांचा प्रकट दिन मात्र घटना तुमच्या मनाजोग्या घटना घडतील. शेअर्स, लॉटरी, रेस यामध्ये विशेष धनलाभाची शक्यता आहे.
कन्या - जुने आजार त्रास देऊ शकतात. नको असलेल्या गोष्टींचा हवा तो विचार गरजेनुसार आपल्या डोक्यात येतो. त्यावर आज नियंत्रण ठेवा.
तूळ - पती-पत्नी एकमेकांचा सल्ला मानणे आज फायदेशीर ठरेल. ठरवलेल्या गोष्टी, कामासाठी सुदिन दाखवणाऱ्या असतील.
वृश्चिक - आज धावपळ होईल पण एकट्याला कसोशीने प्रयत्न करावे लागतील. दिवसाच्या शेवटी यश मिळेल.
धनु - दत्त उपासना, समर्थांची उपासना आज आपल्यासाठी फलदायी ठरेल. उत्तम गोष्टी घडतील. सद्गुरु भेटतील. उपासनेत सातत्य ठेवा. मोठ्या प्रवासांच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.
तूळ - पती-पत्नींचा समन्वय हवा, एकमेकांचा सल्ला मानणे आज फायदेशीर ठरेल. ठरवलेल्या गोष्टी, कामासाठी चांगला दिवस दाखवणाऱ्या असतील.
मकर - सन्मानाने राहायला आपल्याला आवडते. मग अगोदर अशा अनेक गोष्टी केल्या आहेत त्या आजही करा आणि आज नेटाने केलेल्या कामात यश नक्की दिसते आहे. सहकारी सहकार्य करतील.
कुंभ - मैत्री अखंड राहील. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. आनंदामध्ये जुन्या गोष्टींना उजाळा मिळेल. सुखाचे सोबती जवळ असल्यामुळे दिवस आपलासा वाटेल.
मीन - मोक्षमार्गाच्या काही गोष्टी मनामध्ये येतील. विचारांचे थैमान असेल. कामांमध्ये सातत्य ठेवा. नाहक मनस्ताप करून घेऊ नका. दिवस संमिश्र आहे.












Click it and Unblock the Notifications