Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Surya Grahan 2025 : सूर्याचा कन्या राशीत प्रवेश! शुभ योग, ग्रहणाआधी 'या' 3 राशींचे भाग्य उजळणार

Surya Grahan 2025 Taurus Sagittarius Leo lucky : ग्रहताऱ्यांचे विश्व वैज्ञानिक दृष्टीने फारच महत्वाचे आहे. अवकाशात खगोलीय घटना घडतात त्याचा संबंध सृष्टीतील बदलांशी असतो पण ग्रहताऱ्यांचा आणि ज्योतिष्याचा संबंध समाजात रुढ आहे. त्यामुळे सूर्यमालेतील बदलत्या घडामोडी ज्योतिषशास्त्रात महत्वाच्या मानल्या जातात.

21 सप्टेंबर 2025 रोजी सर्वपितृ अमावस्या आणि सूर्य ग्रहण आहे. या वर्षीच्या ग्रहणाआधी सूर्य कन्या राशीत प्रवेश करणार आहे, ज्यामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होतील. ज्योतिषशास्त्रानुसार, या बदलांमुळे ३ राशींच्या नशिबात सुख, यश आणि आर्थिक लाभ येण्याची शक्यता आहे.

Surya Grahan 2025 Taurus Sagittarius Leo lucky zodiac signs

५ दिवसात ४ ग्रहांच्या चाली बदलणार

सप्टेंबर महिन्यातील ग्रहांचे बदल खूप महत्त्वाचे आहेत. 21 सप्टेंबरला सूर्यग्रहण आहे आणि त्यापूर्वीच्या ५ दिवसांत ४ ग्रहांच्या चाली बदलणार आहेत.

13 सप्टेंबर, शनिवार: मंगळ तुळ राशीत प्रवेश करेल.

15 सप्टेंबर: बुध कन्या राशीत आणि शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल.

17 सप्टेंबर: सूर्य कन्या राशीत प्रवेश करेल.

21 सप्टेंबर: सूर्य ग्रहण लागेल.

हेही वाचा : मंगळाचा तुळ राशीत प्रवेश! 'या' 6 राशींचे नशीब पालटणार, धनवर्षाव होणार! तुमची रास आहे का? वाचा

या बदलांचा 12 राशींवर परिणाम होईल, असे असले तरीही वृषभ, सिंह आणि धनू या अशा राशी आहेत, की त्यांचे या बदलत्या दशेत नशीब चमकणार आहे, म्हणजेच या राशींच्या लोकांना हे फलदायी आहे असे ज्योतिषशास्त्रानुसार सांगण्यात येत आहे.

या 3 राशींचे फळफळणार भाग्य

वृषभ: वृषभ राशीच्या लोकांसाठी हे ग्रहयोग खूप शुभ आहेत. तुम्हाला करिअरमध्ये यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल आणि नव्या मार्गांनी धनलाभ होईल. नवीन नोकरीची संधीही मिळू शकते.

सिंह: सिंह राशीच्या लोकांसाठी ग्रहांचे हे बदल खूप चांगले आहेत. मानसिक शांतता मिळेल, तणाव कमी होईल आणि आरोग्याच्या समस्या दूर होतील. तुम्हाला आर्थिक फायदाही होईल.

धनु: धनु राशीसाठी देखील हा काळ चांगला आहे. करिअरमध्ये मोठे बदल दिसतील. पती-पत्नीमधील संबंध चांगले होतील. सर्व अडचणी दूर होतील आणि यश मिळेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+