Ketu Transit 2026 : मार्च २०२६ पर्यंत 'या' ३ राशींना नो टेन्शन! दुप्पट संपत्तीसह मिळणार मोठी संधी
Ketu Transit 2026 : ज्योतिषशास्त्रामध्ये राहू आणि केतू या दोन ग्रहांच्या नावाचा उल्लेख होताच अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होते. केतूला 'मायावी' आणि 'क्रूर' ग्रह मानले जाते, जो जीवनात अचानक उलथापालथ घडवून आणण्यासाठी ओळखला जातो.
मात्र, प्रत्येक वेळी केतू त्रासदायक ठरतो असे नाही. ज्योतिषीय गणनेनुसार, २०२६ हे वर्ष काही राशींसाठी अत्यंत भाग्याचे ठरणार आहे. विशेषतः जानेवारी २०२६ च्या अखेरीस केतू आपली स्थिती बदलून 'दयाळू' होणार असून, तीन राशींच्या व्यक्तींवर सुखाचा वर्षाव करणार आहे.

केतूचे नक्षत्र परिवर्तन: काय सांगते ज्योतिषशास्त्र?
ज्योतिषशास्त्रानुसार, २५ जानेवारी २०२६ रोजी केतू पूर्वाफाल्गुनी नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश करणार आहे. केतू या नक्षत्रात २९ मार्च २०२६ पर्यंत विराजमान राहील. केतूची ही स्थिती अत्यंत फलदायी मानली जाते. जेव्हा केतू शुभ नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा तो व्यक्तीला गूढ ज्ञान, अचानक धनलाभ आणि करिअरमध्ये गरुडभरारी घेण्याची शक्ती प्रदान करतो. या संक्रमणामुळे काही राशींच्या आयुष्यातील 'बॅड पॅच' संपून भाग्योदयाचे नवे दरवाजे उघडणार आहेत. चला जाणून घेऊया, मार्च २०२६ पर्यंत कोणत्या ३ राशींना 'नो टेन्शन' आणि 'फायदाच फायदा' मिळणार आहे:
१. मेष राश (Aries): करिअरमध्ये सुवर्णयोग
मेष राशीच्या जातकांसाठी केतूचे हे संक्रमण एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे आता मार्गी लागतील.
आर्थिक लाभ : गुंतवणुकीतून अनपेक्षित नफा मिळेल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ सर्वोत्तम आहे.
नोकरी-व्यवसाय : कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाचे कौतुक होईल. पदोन्नती (Promotion) आणि पगारवाढीचे प्रबळ योग आहेत.
कौटुंबिक सुख : घरात सुरू असलेले जुने वाद मिटतील. मानसिक शांतता लाभेल आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची दाट शक्यता आहे.
२. कन्या राशी (Virgo): अचानक धनलाभाची संधी
कन्या राशीच्या लोकांसाठी केतूचे हे भ्रमण आर्थिक सुबत्ता घेऊन येणार आहे. केतूच्या शुभ प्रभावामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक भक्कम होईल.
धनाचा ओघ : जुन्या गुंतवणुकीतून, ज्यातून तुम्हाला आशा नव्हती, तिथून दुप्पट परतावा मिळू शकतो. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मानसिक स्वास्थ : कामाचा ताण कमी होईल. आरोग्याच्या तक्रारी दूर होऊन तुम्ही उत्साही अनुभवाल.
सर्जनशीलता : जे लोक कला, साहित्य किंवा कोणत्याही सर्जनशील क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांना या काळात विशेष प्रसिद्धी आणि मान-सन्मान मिळेल.
३. धनु राश (Sagittarius): आत्मविश्वासात मोठी वाढ
धनु राशीच्या जातकांसाठी केतू सकारात्मक ऊर्जेचा स्रोत बनून येईल. रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होतील आणि त्यांना वेग येईल.
प्रगतीची गती: तुमच्या कामात असलेली संथता दूर होईल. रखडलेली कामे पूर्ण झाल्यामुळे मनात समाधानाची भावना राहील.
नवे संपर्क : प्रवासाचे योग असून नवीन लोकांशी होणारी भेट तुमच्या व्यवसायासाठी किंवा करिअरसाठी फायदेशीर ठरेल.
आत्मविश्वास : तुमच्या निर्णयक्षमतेत वाढ होईल. कुटुंबाकडून आणि जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे कठीण कामेही सोपी होतील.
मार्च 2026 पर्यंतचा काळ महत्त्वाचा!
केतूच्या या नक्षत्र बदलामुळे केवळ आर्थिकच नाही, तर आध्यात्मिक उन्नती देखील होणार आहे. ज्यांच्या कुंडलीत केतूची स्थिती अनुकूल आहे, त्यांना या काळात 'दुप्पट संपत्ती' आणि 'मोठ्या संधी' चालून येतील. त्यामुळे घाबरून न जाता, नियोजित कामे पूर्ण करण्यावर भर दिल्यास यश तुमचेच असेल.












Click it and Unblock the Notifications