Aajche Rashibhavishya 16 Jan 2026: मेष-वृश्चिक राशींना धनलाभ, तूळ राशीसाठी प्रगतीचे दारं उघडणार!
Horoscope Today 16 January 2026 : १६ जानेवारी २०२६, शुक्रवार रोजी ग्रहांची स्थिती अनेक राशींसाठी भाग्योदयाची चिन्हे घेऊन आली आहे. आजच्या दिवशी मेष आणि वृश्चिक राशीच्या जातकांना अडकलेले पैसे मिळून धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे, तर तूळ राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये मोठी झेप घेता येईल. जाणून घेऊया सर्व १२ राशींचे सविस्तर भविष्य.

मेष (Aries)
आज तुमच्या प्रलंबित इच्छा पूर्ण होण्याचा दिवस आहे. तुमच्या प्रतिभेमुळे सामाजिक क्षेत्रात तुमचा मान वाढेल.
व्यवसाय : उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. नोकरीत सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा, मार्केटिंग क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस सुवर्णसंधीचा आहे.
प्रेम आणि आरोग्य : वैवाहिक जीवन सुखमय राहील. मात्र, खांदेदुखी किंवा 'सर्व्हायकल'चा त्रास जाणवू शकतो; योगासने फायदेशीर ठरतील.
भाग्यवान रंग : जांभळा | भाग्यवान अंक: ६
वृषभ (Taurus)
केवळ मेहनतीच्या जोरावरच तुमची स्वप्ने पूर्ण होतील. प्रभावशाली व्यक्तींच्या मदतीने कठीण कामे सोपी होतील.
व्यवसाय : स्पर्धेचा काळ आहे, त्यामुळे कामात दिरंगाई करू नका. नोकरी बदलाचे विचार असल्यास आज संधी चालून येऊ शकतात.
प्रेम आणि आरोग्य : जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. मानसिक शांततेसाठी थोडा वेळ अध्यात्मात घालवा.
भाग्यवान रंग : क्रीम | भाग्यवान अंक: २
मिथुन (Gemini)
दिवसाची सुरुवात उत्साही असेल. नवीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित होतील जे भविष्यात फायदेशीर ठरतील.
व्यवसाय : कामात निष्काळजीपणा करू नका, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. नोकरदारांनी वरिष्ठांशी वाद घालणे टाळावे.
प्रेम आणि आरोग्य : मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. हवामान बदलामुळे आरोग्याची काळजी घ्या.
भाग्यवान रंग : बदामी | भाग्यवान अंक: ५
कर्क (Cancer)
आज मालमत्ता किंवा मोठ्या व्यवहारातून आर्थिक लाभ मिळण्याची चिन्हे आहेत. लोक तुमच्या कार्यक्षमतेचे कौतुक करतील.
व्यवसाय: परिस्थिती पूर्णपणे अनुकूल नसल्याने स्वतःला सिद्ध करण्यासाठी अधिक संघर्ष करावा लागेल.
प्रेम आणि आरोग्य: विवाहबेडीत अडकू पाहणाऱ्यांसाठी उत्तम स्थळे येतील. सर्दी-खोकल्याचा त्रास संभवतो.
भाग्यवान रंग: हिरवा | भाग्यवान अंक: ७
सिंह (Leo)
आज मनोरंजनावर खर्च होईल, पण आर्थिक स्थिती मजबूत असल्याने चिंता नसेल. कौटुंबिक बाबींकडे दुर्लक्ष करू नका.
व्यवसाय: कार्यपद्धतीत केलेले बदल सकारात्मक ठरतील. रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा व्यवसायावर परिणाम होऊ शकतो.
प्रेम आणि आरोग्य: जोडीदाराच्या सहकार्याने घरगुती प्रश्न सुटतील. वाहन चालवताना सावधानता बाळगा.
भाग्यवान रंग: लाल | भाग्यवान अंक: ९
कन्या (Virgo)
तुमचा एखादा महत्त्वाचा निर्णय भविष्यात मोठे फळ देईल. अध्यात्माकडे कल वाढेल.
व्यवसाय: मशिनरी आणि तांत्रिक क्षेत्रातील लोकांसाठी दिवस चांगला आहे. नवीन करार करताना सावधगिरी बाळगा.
प्रेम आणि आरोग्य: प्रेमीयुगुलांमध्ये जवळीक वाढेल. मात्र, कामाच्या व्यापामुळे तणाव जाणवू शकतो.
भाग्यवान रंग: बदामी | भाग्यवान अंक: १
तूळ (Libra)
आत्मविश्वास शिखरावर असेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. समाजात मानसन्मान मिळेल.
व्यवसाय: जुन्या कामांव्यतिरिक्त नवीन क्षेत्रांत गुंतवणूक करण्याचा विचार करा. कामाच्या निमित्ताने प्रवास घडू शकतो.
प्रेम आणि आरोग्य: घरात आनंदी वातावरण राहील. पचनाच्या तक्रारी जाणवू शकतात, आहार संतुलित ठेवा.
भाग्यवान रंग: निळा | भाग्यवान अंक: ४
वृश्चिक (Scorpio)
अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. वाचन आणि छंदांसाठी वेळ मिळाल्याने ताजेतवाने वाटेल.
व्यवसाय: मालमत्तेच्या कामात मोठा नफा होऊ शकतो, पण कागदपत्रे नीट तपासा. ऑफिसमधील बैठकीत तुमचे महत्त्व वाढेल.
प्रेम आणि आरोग्य: प्रेमसंबंधांना घरच्यांची मान्यता मिळू शकते. मायग्रेनचा त्रास असणाऱ्यांनी काळजी घ्यावी.
भाग्यवान रंग: पिवळा | भाग्यवान अंक: ५
धनु (Sagittarius)
सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि आर्थिक योजना यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना करिअरमध्ये चांगली बातमी मिळेल.
व्यवसाय: घाऊक व्यापाऱ्यांसाठी दिवस नफ्याचा आहे. नोकरीत बदलीचे योग असून तरुणांना नवीन नोकरी मिळू शकते.
प्रेम आणि आरोग्य: पती-पत्नीमध्ये उत्तम ताळमेळ राहील. रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी विश्रांती घ्यावी.
भाग्यवान रंग: पांढरा | भाग्यवान अंक: ४
मकर (Capricorn)
जुन्या चुकांमधून शिकून पुढे जाण्याचा हा काळ आहे. गेल्या काही दिवसांपासून असलेली चिंता आज दूर होईल.
व्यवसाय: संपर्कांचा फायदा होईल, पण उत्पादनाच्या गुणवत्तेवर लक्ष द्या. ऑफिसमध्ये टीमवर्कमुळे यश मिळेल.
प्रेम आणि आरोग्य: व्यस्त दिनचर्येतून कुटुंबासाठी वेळ काढा. आयुर्वेदाचा अवलंब करणे आरोग्यासाठी हिताचे ठरेल.
भाग्यवान रंग: आकाशी | भाग्यवान अंक: २
कुंभ (Aquarius)
तुमच्या कष्टाने तुम्ही कठीण परिस्थितीवर मात कराल. मालमत्तेचा एखादा मोठा व्यवहार मार्गी लागू शकतो.
व्यवसाय: व्यावसायिक गुप्तता पाळा. सरकारी नोकरीत असलेल्यांनी ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहावे.
प्रेम आणि आरोग्य: मित्रांसोबत जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. सर्दी आणि डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
भाग्यवान रंग: केशरी | भाग्यवान अंक: ३
मीन (Pisces)
एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या भेटीमुळे तुमच्या विचारांना नवी दिशा मिळेल. धार्मिक कार्यात मन रमेल.
व्यवसाय: नवीन जनसंपर्क वाढवण्यावर भर द्या. कामाचा व्याप जास्त असला तरी त्याचे फळ गोड असेल.
प्रेम आणि आरोग्य: कुटुंबात सलोखा राहील. नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका, त्याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो.
भाग्यवान रंग: गुलाबी | भाग्यवान अंक: ७
-
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Rajya Sabha Election 2026 Result : राज्यसभेच्या 37 जागांचा निकाल; पाहा विजेत्यांची यादी -
अदानी टोटल गॅसकडून औद्योगिक ग्राहकांसाठी अतिरिक्त नैसर्गिक वायूच्या दरात कपात -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Gold silver price today : सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात मोठी घसरण; वाचा ताजे दर -
Oscars 2026 Winners : ऑस्कर पुरस्कारांची घोषणा हा चित्रपट ठरला सर्वात भारी; पाहा संपूर्ण विनर लिस्ट -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
Health News : जोडीदाराला किस करणं पडू शकतं महागात! वेळीच सावध व्हा, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय -
आजचे राशीचक्र: कुणाचे नशीब चमकणार आणि कुणाला संघर्ष करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य








Click it and Unblock the Notifications