Daily horoscope 28 dec 2025 : 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार पदोन्नतीची संधी; वाचा आजचे राशीभविष्य
Daily horoscope 28 dec 2025 : आजचे राशीभविष्य देत आहोत, आपल्या राशीत आज काय, कुणाचे भाग्य फळफळणार, कुणाला काय फायदे नुकसान मिळणार याचा उहापोह दिला आहे, तो वाचून तुम्ही तुमच्या आजच्या दिवसाचा अंदाज लावू शकता.
सिंह राशी (Leo): बौद्धिक किंवा कार्यालयीन क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांना आज पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही कल्पनाविश्वात रमाल, मात्र वास्तवाचे भान ठेवणे आवश्यक आहे. सहकाऱ्यांसोबत सहलीचे नियोजन होऊ शकते. कामावर लक्ष केंद्रित करा आणि इतरांना तुमच्या ध्येयापासून भरकटवू देऊ नका. आरोग्य उत्तम राहील.

कन्या राशी (Virgo): आजचा दिवस अध्यात्मिक विचारांनी सुरू करणे लाभदायक ठरेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात काही प्रमाणात अस्थिरता जाणवेल, पण तुम्ही शांतपणे परिस्थिती हाताळाल. नोकरीत बढतीचे योग आहेत. अचानक होणारी धनप्राप्ती तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.
तूळ राशी (Libra): आज तुम्ही जुन्या चांगल्या आठवणीत रमाल. नशिबाची पूर्ण साथ लाभल्याने तुम्ही आनंदी असाल. वैयक्तिक नात्यात जवळीक वाढेल; जोडीदाराला एखादा प्रेमळ संदेश किंवा सरप्राईज देऊन तुम्ही त्यांचे मन जिंकाल. आरोग्य आणि संपत्तीच्या बाबतीत दिवस तुमच्या बाजूने असेल.
वृश्चिक राशी (Scorpio): भूतकाळात केलेल्या सत्कर्माचे फळ मिळण्याची हीच वेळ आहे. वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांकडून काहीतरी नवीन शिकायला मिळेल. घरातील ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा ठरेल. पैशांचा ओघ वाढल्याने तात्पुरती आर्थिक अडचण दूर होईल. आरोग्याबाबत जागरूक राहा, औषधोपचाराची गरज भासू शकते.
धनु राशी (Sagittarius): व्यावसायिक व्यवहारांबाबत आज सावध राहा आणि उद्योग विस्तारावर भर द्या. एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीची भेट होऊ शकते. वैयक्तिक आयुष्यात प्रगती झाल्याने समाधानाची भावना राहील. जुन्या प्रकल्पांमुळे तुमची आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल.
मकर राशी (Capricorn): कामाचा अति ताण घेऊ नका, थोडा विसावा घ्या. तुमच्या प्रामाणिकपणामुळे व्यवसायात वृद्धी होईल. फोनद्वारे एखादी गोड बातमी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात, त्यामुळे बाहेरचे किंवा अस्वास्थ्यकर अन्न खाणे टाळा.
कुंभ राशी (Aquarius): प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मक बदल घडतील, ज्यामुळे नात्यातील बंध अधिक घट्ट होतील. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवा, अन्यथा मनस्ताप होऊ शकतो. प्रिय व्यक्तीकडून एखादी भेटवस्तू मिळण्याचे योग आहेत. आर्थिक आणि आरोग्य स्थिती चांगली राहील.
मीन राशी (Pisces): आज कामाचा व्याप वाढल्याने थोडा ताण जाणवेल. मात्र, ध्येय साध्य करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. जुन्या योजनांमधून उत्पन्न वाढल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, किरकोळ समस्या उद्भवू शकतात.
(विशेष टीप : वरील माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या संदर्भांवर आधारित आहे. कोणतीही कृती करण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञ किंवा ज्योतिषांचा सल्ला जरूर घ्यावा.)












Click it and Unblock the Notifications