Chandra Grahan 2026 होळीवर चंद्रग्रहणाचे सावट! 'या' 4 राशींसाठी धोक्याची घंटा; जाणून घ्या ग्रहण वेळ
Chandra grahan 2026 holi impact : सन २०२६ मधील पहिले चंद्रग्रहण ३ मार्च रोजी लागणार आहे. विशेष म्हणजे, यंदा होळीच्या काळातच हे ग्रहण येत असल्याने उत्सवाच्या तारखांमध्ये बदल झाला आहे. ३ मार्चला ग्रहण असल्याने यंदा रंगांची होळी (धुलिवंदन) ४ मार्च रोजी साजरी केली जाईल. हे ग्रहण 'सिंह' राशीत लागत असून ज्योतिषशास्त्रानुसार त्याचे मानवी जीवनावर, विशेषतः चार राशींवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ग्रहणाची वेळ आणि सूतक काळ
भारतीय पंचांगानुसार, ३ मार्च २०२६ रोजी सकाळी ०६:२० वाजल्यापासून सूतक काळ सुरू होईल, जो संध्याकाळी ०६:४६ पर्यंत असेल. ग्रहणाची मुख्य वेळ दुपारी ३:२० पासून सुरू होईल, तर भारतात संध्याकाळी ६:१७ वाजता हे ग्रहण स्पष्टपणे पाहता येईल. ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि पूर्व आशियातील काही भागांतही हे ग्रहण दिसणार आहे.
'या' ४ राशींनी राहावे सावध!
ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीत होणारे हे ग्रहण खालील राशींसाठी 'अशुभ' मानले जात आहे.
- १. मेष: मान-सन्मानाला धक्का लागू शकतो, कोणत्याही वादात पडणे टाळावे.
- २. कर्क: आर्थिक व्यवहारात धोका आहे; गुंतवणुकीचा विचार सध्या टाळावा.
- ३. सिंह: ग्रहण याच राशीत असल्याने आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात, विशेष काळजी घ्या.
- ४. धनु: संयम ठेवावा लागेल, अन्यथा रागाच्या भरात मोठे नुकसान होऊ शकते.
काय आहे 'ब्लड मून' (Blood Moon)?
३ मार्च रोजी आकाशात चंद्र काही काळासाठी लाल किंवा गुलाबी रंगाचा दिसेल, ज्याला शास्त्रज्ञ 'ब्लड मून' म्हणतात. शास्त्रज्ञांच्या मते ही केवळ एक खगोलीय घटना आहे, मात्र ज्योतिषशास्त्रात चंद्राचा बदललेला रंग येणाऱ्या संकटाचे प्रतीक मानला जातो. हे ग्रहण साध्या डोळ्यांनी पाहणे सुरक्षित असल्याचे वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे.
अरिष्ट टाळण्यासाठी करा 'हे' उपाय (धार्मिक समज आणि धारणेनुसा)
- मंत्रजप: 'ॐ सोमाय नमः' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.
- दानधर्म: दूध, तांदूळ किंवा खडीसाखर यांसारख्या पांढऱ्या वस्तूंचे दान करावे.
- शिव उपासना: शिवलिंगावर जल अर्पण करावे आणि अभिषेक करावा.
- नकारात्मकता टाळा: ग्रहण काळात नकारात्मक विचार आणि कृतींपासून दूर राहावे.












Click it and Unblock the Notifications