OpenAI CEO Sam Altman : 'ओपन एआय'च्या CEO मोठा दावा; AI करणार 40% कामं! मग नोकऱ्यां जाणार का? वाचा

OpenAI CEO Sam Altman claims : जगभरात सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या तंत्रज्ञानावर जोरदार चर्चा सुरू आहे. हे तंत्रज्ञान मानवी जीवन सोपे करेल की नोकऱ्यांवर मोठे संकट उभे करेल, हा प्रश्न अनेकांना सतावत आहे. याच पार्श्वभूमीवर, ओपनएआय (OpenAI) आणि चॅटजीपीटी (ChatGPT) चे सीईओ सॅम ऑल्टमॅन (Sam Altman) यांनी एक मोठे विधान केले आहे.

जर्मनीच्या 'डाई वेल्ट' (Die Welt) या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ऑल्टमॅन यांनी दावा केला आहे की, एआय (AI) तंत्रज्ञान इतके प्रगत होईल की, ते भविष्यात मानवी कामांपैकी जवळपास ४० टक्के कामे स्वतः करू शकेल. त्यामुळे येत्या काही वर्षांत काम करण्याच्या पद्धतीत मोठे आणि वेगवान बदल होतील.

OpenAI CEO Sam Altman claims

काय आहे ऑल्टमॅन यांचा दावा:

सॅम ऑल्टमॅन यांना मुलाखतीत थेट विचारण्यात आले की, एआय किती नोकऱ्या संपुष्टात आणेल? यावर त्यांनी दिलेले उत्तर विचार करायला लावणारे आहे. "हा प्रश्न नोकऱ्यांच्या संख्येपेक्षा जास्त कामांच्या संख्येचा आहे. मी सहजपणे अशा जगाची कल्पना करू शकतो, जिथे आज होत असलेली ३० ते ४० टक्के कामे एआय (AI) करेल." ऑल्टमॅन यांनी स्वीकारले की, या बदलाचा परिणाम काही क्षेत्रांमध्ये नोकऱ्यांवर निश्चितच पडेल.

सुपर इंटेलिजन्स आणि AGI चे युग ऑल्टमॅन यांच्या म्हणण्यानुसार, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे 'सुपर इंटेलिजन्स' चा काळ आला आहे. त्यांनी दावा केला की, जीपीटी-५ मॉडेल हे सध्या माझ्यापेक्षा आणि अनेक लोकांशी अधिक हुशार आहे.

२०३० पर्यंत मोठे बदल

२०३० पर्यंत आपल्याकडे अशी मॉडेल्स असतील, जी मानवापेक्षाही अधिक असामान्य क्षमता दाखवतील आणि जी कामे आपण स्वतः करू शकत नाही, ती देखील करू शकतील.

एजीआय (AGI) लवकरच

आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स (AGI), म्हणजे मानवी बुद्धिमत्तेइतकी किंवा त्याहून अधिक क्षमता असलेले तंत्रज्ञान, या दशकाच्या अखेरीस सत्य होईल. एआय आणि मानवाच्या संबंधावर बोलताना ऑल्टमॅन म्हणाले की, तंत्रज्ञान नेहमीच कामाचे स्वरूप बदलत आले आहे आणि यावेळीही तसेच होईल, फक्त बदलाची गती खूप जास्त असेल. ऑल्टमॅन यांच्या मते, एजीआय मानवांशी 'प्रेमळ पालकांसारखे' वर्तन करेल. अनेक नोकऱ्या संपुष्टात येतील, पण त्याचबरोबर नवीन प्रकारचे काम आणि व्यवसायही समोर येतील.

हेही वाचा : AI Health एआय आजच सांगेल, 10 वर्षांनी तुम्हाला कोणता आजार होऊ शकतो! कॅन्सर, हृदयविकार समजेल का? वाचा

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+