AI Health एआय आजच सांगेल, 10 वर्षांनी तुम्हाला कोणता आजार होऊ शकतो! कॅन्सर, हृदयविकार समजेल का? वाचा
AI Health New AI Tool Can Predict Diseases 10 Years in Advance :AI Health : तुम्हाला कधी असा विचार आला आहे का, की भविष्यात तुम्हाला कोणता आजार होऊ शकतो हे आजच कळले तर? आता हे स्वप्न सत्यात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) तंत्रज्ञानाने आरोग्य क्षेत्रात एक मोठी क्रांती घडवून आणली आहे.
युरोपमधील तज्ज्ञांनी भविष्यात कोणता आजार होऊ शकतो यासंदर्भात Delphi-2M नावाचे एक अत्याधुनिक AI टूल विकसित केले आहे, जे एखाद्या व्यक्तीला पुढील १० वर्षांत किंवा त्याहूनही अधिक काळात होणाऱ्या गंभीर आजारांचा अंदाज लावू शकते.

या क्रांतीमुळे मानवी जीवनमान अधिक वाढू शकते यामुळे जगणेही सुसह्य होणार असून संभाव्य आजार आधीच समजणार असल्याने आगामी काळातील आरोग्याच्या समस्यांवर आतापासूनच लक्ष देता येणार आहे. यामुळे संभाव्य आर्थिक हाणी आणि शारिरीक हाणी टळु शकेल. हे तंत्र सर्व जगासाठी वरदान ठरु शकते.
फक्त चित्रपटात दिसणारी गोष्ट आता खरी झाली!
आतापर्यंत आपण सायन्स फिक्शन चित्रपटांमध्येच असे प्रयोग पाहिले होते, जिथे भविष्य वर्तवणारी यंत्रणा अस्तित्वात होती. पण, आता हे तंत्रज्ञान वास्तवात येत आहे. Delphi-2M हे AI टूल सुमारे २३ लाख लोकांच्या आरोग्यविषयक डेटावर आधारित आहे. यामध्ये यूके बायोबँक स्टडी आणि डॅनिश नॅशनल पेशंट रजिस्ट्रीमधील डेटाचा वापर करण्यात आला आहे. लार्ज लँग्वेज मॉडेलसारख्या अल्गोरिदमवर याला प्रशिक्षण दिले आहे, ज्यामुळे ते १,००० हून अधिक रोगांचा धोका ओळखू शकते.
कॅन्सर, हृदयविकारांपासून मिळेल मुक्ती?
आजकाल कॅन्सर, हृदयविकारासारख्या अनेक गंभीर आजारांचे निदान खूप उशिरा होते, ज्यामुळे उपचार करणे कठीण होते. हे AI टूल याच समस्येवर उपाय ठरू शकते. जर या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला, तर लोकांना वेळेआधीच आपल्या आरोग्याच्या धोक्याबद्दल सतर्क करता येईल. यामुळे वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतील आणि गंभीर आजारांना वेळीच रोखता येईल.
कुणी केले हे तंत्र विकसित?
हे तंत्रज्ञान मॉलिक्युलर बायोलॉजी लॅबोरेटरी, जर्मन कॅन्सर रिसर्च सेंटर आणि कोपनहेगन युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांनी मिळून विकसित केले आहे. हे टूल वैद्यकीय क्षेत्रात केवळ संशोधनासाठीच नाही, तर सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी एक मोठा वरदान ठरू शकते.
हेही वाचा : अवघ्या पंचवीस, तिसाव्या वर्षी हार्ट अटॅक का येतोय? हृदयविकार टाळण्यासाठी 'या' गोष्टी महत्वाच्या,वाचा












Click it and Unblock the Notifications