Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

टी-शर्ट वरचा 'शुगर डॅडी'चा मॅसेज आणि धनश्री वर्मा ट्रोल; यजुवेंद्र चहलने नेमके काय केले? वाचा

भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी कोरिओग्राफर धनश्री वर्मा आज कायदेशीररित्या वेगळे झाले. आज चहल आणि धनश्रीच्या घटस्फोटावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. यापूर्वी दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. आज जेव्हा युजवेंद्र चहल कोर्टवर पोहोचला तेव्हा सर्वांचे लक्ष त्याच्या टी-शर्टकडे गेले. या टी-शर्टवर असे काहीतरी लिहिले होते, ज्यामुळे एकच चर्चा रंगली.

Yuzvendra Chahal-Dhanashree Verma divorce

मास्क घालून कोर्टात

आज यजुवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा तोंडावर मास्क घालून कोर्टात पोहोचले. कोर्टात येताना चहलने एक जॅकेट घातले होते. ज्याने त्याचे डोकेही झाकले होते. कोर्टतून बाहेर येतना मात्र त्याने अंगातील जॅकेट काढले. जेव्हा तो बाहेर आला तेव्हा जॅकेट त्याच्या हातात होते. मग त्याच्या टी-शर्टवर एक मेसेज दिसला, जो लोक धनश्रीशी जोडत आहेत.

टी-शर्टवर काय होता मेसेज

युजवेंद्र चहलच्या टी-शर्टवर (स्वतःचे शुगर डॅडी व्हा) असा संदेश लिहिलेला होता. ज्याचा अर्थ असा आहे की तुम्ही स्वतःला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवा आणि तुमच्या खर्चासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. आता चहलचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक ते धनश्रीशी जोडत आहेत आणि म्हणत आहेत की याद्वारे त्याने धनश्रीवर टीका केली आहे.

'शुगर डॅडी' म्हणजे काय?

'शुगर डॅडी' हा शब्द अशा पुरूषासाठी वापरला जातो, जो लहान मुलांशी संबंध ठेवतो. जी मुले आर्थिकदृष्या या डॅडीवर अबलंबून असतात. हे सामान्य नात्यापेक्षा वेगळे आहे कारण त्यात पैशाला जास्त महत्त्व असते. यामुळेच धनश्री वर्मासाठीचा हा मॅसेज होता, असे आता बोलले जात आहे.

किती मिळाली पोटगी

एका मिडिया रिपोर्टनुसार, घटस्फोटानंतर युजवेंद्र चहलने धनश्री वर्माला ४ कोटी ७४ लाख रुपये देण्याचे मान्य केले आहे. चहल आणि धनश्रीचे डिसेंबर २०२० मध्ये लग्न झाले. असे म्हटले जात आहे की दोघेही गेल्या दीड वर्षांपासून वेगळे राहत आहेत.

कमेंट्सचा भडीमार

सोशल मीडियावर यजुवेंद्र चहलचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याखाली चाहत्यांच्या कमेंट आल्या. त्याखाली एकाने लिहिले की, या टी-शर्टने सगळं सांगितलं. तर दुसऱ्या युजरने तुम्ही आरजे महाविश पहात आहात का, असा प्रश्न विचारला. धनश्रीने यजुवेंद्र चहलपासून वेगळे झाल्यानंतर तिचे नाव आरजे महाविश याच्यासोबत जोडले गेले आहे. मात्र या दोघांनीही अद्याप यावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+