क्रिकेटर युजवेंद्र सिंग चहल आणि धनश्री वर्मा यांच्यात घटस्फोट ? जाणून घ्या काय आहे सत्य
Dhanashree Verma-Yuzvendra Chahal Divorce: क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन वर्तुळात या स्टार कपलच्या विभक्त झाल्याच्या बातम्यांनी खळबळ उडाली होती. त्याच्या जवळच्या व्यक्तीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
घटस्फोटाच्या अफवांमध्ये दोघांनी एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. युझवेंद्रने धनश्रीसोबतचे सर्व फोटोही डिलीट केले आहेत. धनश्रीने युझवेंद्रला अनफॉलो केले आहे, पण त्याचे फोटो अजून डिलिट केलेल नाहीत. मिळालेल्या माहीतीनुसार घटस्फोट अंतिम आहे, फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.

धनश्री वर्मा आणि युझवेंद्र सिंग चहल यांच्यात तणाव
मागील काही दिवसांपासून धनश्री वर्मा आणि क्रिकेटर युजवेंद्र सिंह चहल यांच्या वैवाहिक जीवनात तणावाचे वातावरण आहे. दोघांमध्ये मतभेद असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
22 डिसेंबर 2020 रोजी झालं लग्न
प्रसिद्ध कोरिओग्राफर धनश्री वर्मा आणि भारतीय क्रिकेटर युजवेंद्र सिंग चहल यांनी 22 डिसेंबर 2020 रोजी लग्न केलं आहे. सध्या दोघांचा घटस्फोट झाल्याच्या बातम्या येत आहेत.
धनश्री वर्मा आणि युझवेंद्र सिंग चहल यांच्यात घटस्फोट?
-भारतीय क्रिकेटर युजवेंद्र सिंग चहल इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. तो अनेकदा मस्तीच्या मूडमध्ये दिसतो, पण अलीकडेच त्याने असे काही केले की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
-युजवेंद्र सिंग चहलने त्याची पत्नी आणि कोरिओग्राफर धनश्री वर्माला त्याच्या इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. तिच्यासोबतचे सर्व फोटोही डिलीट केले आहेत.
-चहलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर धनश्री वर्मासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे, जो त्याच्या रणवीर अलाहाबादियासोबतच्या पॉडकास्टमधून आहे.
- धनश्रीनेही तिचा नवरा युजवेंद्र सिंग चहलला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे, पण त्याच्यासोबतचे फोटो डिलिट केले नाहीत.
-तेव्हापासून घनश्री वर्मा आणि युझवेंद्र सिंग चहल यांचे वैवाहिक आयुष्यात सर्व काही ठीक नसल्याचे दिसून येत आहे. तसेच लवकरच त्यांच्यात घटस्फोट होऊ शकतो अशी चर्चा आहे.












Click it and Unblock the Notifications