Year Ender 2024: या वर्षी वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कोण ? या देशाचा राहिला बोलबाला
Year Ender 2024: टीम इंडियासाठी 2024 हे वर्ष शानदार राहिलं आहे. क्रिकेटमधील सर्वात लहान फॉरमॅट असलेल्या टी-20 मध्ये आपलं वर्चस्व गाजवलं आहे. भारतीय संघाने 17 वर्षांनंतर या फॉरमॅटमध्ये विश्वचषक जिंकला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी केली. याउलट एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे काम अवघड झाले आहे. तीन सामने खेळल्यानंतर एकही विजय मिळवता आला नाही.
श्रीलंकेच्या संघाने या फॉरमॅटमध्ये वर्चस्व कायम राखले आहे. श्रीलंकेच्या फलंदाजांनी शानदार खेळ करत जगातील दिग्गज खेळाडूंना मागे टाकत अव्वल स्थान मिळवलं आहे. या वर्षी जेव्हा आपण एकदिवसीय क्रिकेटमधील अव्वल फलंदाजांबद्दल बोलतो तेव्हा श्रीलंकेचे नाव आघाडीवर दिसते. श्रीलंकेच्या फलंदाजांनी टॉप तीन स्थानी कब्जा केला आहे. त्यांच्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

फोटो सौजन्य- पीटीआय
कुसल मेंडिस
या वर्षी सर्वाधिक एकदिवसीय धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत कुसल मेंडिसचं सर्वात वर आहे. मेंडिसने गोलंदाजांची धुलाई करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्याने या वर्षी एकूण 17 एकदिवसीय सामने खेळले असून 742 धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून 6 अर्धशतके आणि एक शतक झळकलं आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या १४३ धावांची आहे.
पथुम निसंका
श्रीलंकेचा झंझावाती फलंदाज निसांकाचे नाव दुसऱ्या स्थानावर आहे. 100 च्या वर स्ट्राईक रेटने धावा करत त्याने वादळ निर्माण केले. निसांकाने 12 सामन्यात 694 धावा केल्या आहेत. त्याने आपल्या बॅटने जास्त शतके झळकावली आहेत. एकूण तीन शतके झळकावणाऱ्या या फलंदाजाने दोन अर्धशतकेही झळकावली आहेत. या काळात त्याने आपल्या बॅटने द्विशतकही झळकावलं आहे. पथुम निसंका 210 धावांची नाबाद खेळी खेळली राहिली आहे.
चरित अस्लंका
या यादीत श्रीलंकेच्या आणखी एका फलंदाजाने आपले स्थान निर्माण केले आहे. असलंकाने 18 सामन्यात एकूण 605 धावा केल्या आहेत. त्याच्या बॅटमधून एक शतक आणि 4 अर्धशतकांची खेळी पाहायला मिळाली. त्याची 101 धावांची खेळी ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती. अशाप्रकारे श्रीलंकेने अव्वल तीन स्थानांवर कब्जा केला आहे.












Click it and Unblock the Notifications