Year Ender 2024: या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये या खेळाडूंचा राहिला जलवा, टॉप 5 गोलंदाज
Top Five Highest Wicket-Taker: 2024 वर्ष संपयाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. आज आपण वर्षभरातील क्रिकेटमधील गोलंदाची कामगिरीचा आढावा घेणार आहोत. एकीकडे खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट फॉर्मने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे तर दुसरीकडे काही विक्रमांनी किक्रेटप्रेमींच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले. या वर्षातील काही रंजक आकडेवारी जाणून घेऊया.
आज आपण चालू वर्षातील सर्वात धोकादायक गोलंदाजांची कामगिरी जाणून घेणार आहोत. ज्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. 2024 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेने सर्वाधिक सामने जिंकले आहेत.

1 वानिंदू हसरंगा (श्रीलंका)- 26 विकेट्स
श्रीलंकेचा उत्कृष्ट फिरकीपटू वानिंदू हसरंगा याने या वर्षी वनडेमध्ये संयुक्त-सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून म्हणून आघाडीवर आहे. हसरंगाने फक्त 10 सामन्यांमध्ये 15.61 च्या सरासरीने 26 बळी घेतले आहेत. या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमधील हसरंगाची सर्वात उत्कृष्ट कामगिरी बांगलादेशविरुद्ध चितगाव येथे राहिली. ज्याठिकाणी त्याने 7/19 अशी उत्कृष्ट कामगिरी राहिली होती.
2. डायलन हेलिगर (कॅनडा) - 26 विकेट्स
कॅनडाचा मध्यमगती गोलंदाज डिलॉन हेलिगरने 2024 मध्ये 14 सामन्यांत 22 च्या सरासरीने 26 विकेट घेऊन एकदिवसीय क्रिकेटमध्ये संयुक्त-सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या प्रभावी कामगिरीमध्ये एकदा पाच बळी आणि दोन वेळा चार बळींचा समावेश आहे. सप्टेंबरमध्ये किंग सिटी येथे नेपाळविरुद्ध दिलनची सर्वोत्तम गोलंदाजी 5/31 अशी होती.
3. आर्यन दत्त (NED) - 21 विकेट्स
नेदरलँडचा ऑफस्पिनर आर्यन दत्तने 2024 मध्ये 12 सामन्यांत 18.71 च्या सरासरीने 21 विकेट्स घेऊन तिसरा सर्वाधिक एकदिवसीय बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या प्रभावी कामगिरीमध्ये एकदा पाच विकेट घेण्याचाही समावेश होता. त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कीर्तिपूरमध्ये नामिबियाविरुद्ध 6/34 अशी होती.
4. अल्लाह गझनफर (AFG) - 21 विकेट्स
अफगाणिस्तानचा ऑफस्पिनर अल्लाह गझनफरने 2024 मध्ये 21 विकेट घेतल्या आहेत. या वर्षातील त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी 6/26 शारजाहमध्ये बांगलादेशविरुद्ध आली. बांगलादेशविरुद्ध त्याच्या स्पेलने 92 धावांनी शानदार विजय मिळवून दिला. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.
5. नॉथुश केंजिगे (USA) - 20 विकेट
युनायटेड स्टेट्स (यूएसए) फिरकीपटू नॉथुश केंजिगेने 2024 मध्ये 12 सामन्यांत 21.90 च्या सरासरीने 20 विकेट घेतल्या. आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या नॉस्तुशच्या प्रभावशाली आकडेवारीत चार विकेट्सचा समावेश आहे. 2024 मध्ये केंजिगेची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी नेपाळविरुद्ध डॅलसमध्ये झाली, जिथे त्याने 4/52 अशी कामगिरी केली होती.












Click it and Unblock the Notifications