Year Ender 2024: या वर्षी हे मोठे स्टार्स पडद्यावर दिसले नाहीत, 2023 मध्ये मोडले अनेक रेकॉर्ड

Year Ender 2024: चालू वर्ष 2024 हे संपायला आता अवघे काही दिवसचं शिल्लक राहिले आहेत. प्रत्येकजण नवीन वर्ष 2025 च्या स्वागतसाठी सज्ज झाले आहेत. पण 2024 हे वर्ष अनेक बॉलिवूड स्टार्ससाठी खास ठरले तर काही कलाकारसांठी विशेष काही खास नाही राहिलं. असे अनेक कलाकार आहेत ज्यांचा 2024 या वर्षात एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते.

तर चला मग जाणून घेऊया असे कोणते कलाकार आहेत, ज्यांचा चित्रपट 2024 मध्ये रिलीज झाला नाही.

shahrukh khan and ranbir kapoor


सलमान खान

बॉलिवूडचा दबंग सलमान खान शेवटचा टायगर 3 या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली परंतु 2024 साली त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. सध्या सलमान त्याच्या आगामी सिकंदर या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. जो 2025 मध्ये रिलीज होणार आहे.

शाहरुख खान

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा 2023 मध्ये दबदबा होता. या अभिनेत्याचे पठाण, जवान आणि डंकी हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. पण किंग खानचा एकही चित्रपट 2024 साली प्रदर्शित झाला नाही. आता हा शाहरुख पुढील 'किंग' चित्रपटात दिसणार आहे.

रणबीर कपूर

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरचा ॲनिमल हा चित्रपट 2023 साली प्रदर्शित झाला होता. अभिनेत्याच्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. पण 2024 मध्ये त्यांचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. रणबीर कपूर 'ॲनिमल' या चित्रपटाच्या सिक्वेलची तयारी करत असल्याची बातमी आहे. याशिवाय तो 'रामायण' आणि 'लव्ह अँड वॉर' सारख्या चित्रपटात दिसणार आहे.

सनी देओल

बॉलीवूड अभिनेता सनी देओलने 2023 साली गदर 2 चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर शानदार पुनरागमन केलं. आता या अभिनेत्याचे अनेक चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. काही दिवसांपुर्वीच त्याने त्याच्या पुढील चित्रपट बॉर्डर 2 ची घोषणा केली होती .

आयुष्मान खुराना

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना चाहत्यांसाठी नेहमीच काहीतरी वेगळे घेऊन येतो. यामुळेच चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र 2024 साली त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. दरम्यान अभिनेत्याने अद्याप त्याच्या पुढील चित्रपटाची कोणतेही घोषणा केलेली नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+