Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी काळजीची बातमी! यशस्वी जयस्वाल रुग्णालयात दाखल; 'या' आजाराचं झालं निदान

Yashasvi Jaiswal Hospitalised : भारतीय क्रिकेट संघाचा युवा आणि धडाकेबाज सलामीवीर यशस्वी जयस्वाल याच्या प्रकृतीबाबत एक मोठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मधील एका सामन्यात खेळल्यानंतर अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यशस्वीला 'ॲक्युट गॅस्ट्रोएन्टेरिटिस' (तीव्र पोटाचा संसर्ग) झाल्याचे निदान झाले आहे.

Yashasvi Jaiswal Hospitalised

अचानक प्रकृती बिघडली, मध्यरात्री रुग्णालयात हलवले

मंगळवारी मुंबई आणि राजस्थान यांच्यात सुपर लीगचा सामना पार पडला. या सामन्यात राजस्थानकडून खेळताना यशस्वीने १५ धावांची खेळी केली. मात्र, सामना संपल्यानंतर काही तासांतच त्याच्या पोटात तीव्र कळा आणि वेदना सुरू झाल्या. त्रास वाढल्याने त्याला तातडीने पिंपरी-चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात नेण्यात आले.

रुग्णालयातील प्राथमिक तपासणीत त्याला गॅस्ट्रोएन्टेरिटिस झाल्याचे समोर आले. डॉक्टरांनी त्याला तातडीने आयव्ही (IV) औषधे दिली असून सीटी स्कॅन आणि अल्ट्रासाऊंड यांसारख्या आवश्यक चाचण्याही केल्या आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्याला पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत यशस्वीची चमकदार कामगिरी

प्रकृती बिघडण्यापूर्वी यशस्वी जयस्वाल जबरदस्त फॉर्मात होता. टी-२० स्पर्धेत त्याने आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांत ४८.३३ च्या सरासरीने आणि १६८.६ च्या स्ट्राईक रेटने १४५ धावा कुटल्या आहेत. नुकत्याच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेतही त्याने १५६ धावा करत आपल्या बॅटची ताकद दाखवून दिली होती. यशस्वी जयस्वाल लवकर बरा होऊन पुन्हा एकदा मैदानात चौकार-षटकारांचा पाऊस पाडेल, अशी आशा त्याचे चाहते व्यक्त करत आहेत.

सामन्याचा थरार: मुंबईचा राजस्थानवर विजय

ज्या सामन्यात यशस्वीची प्रकृती बिघडली, तो सामना अत्यंत रोमांचक झाला. २०० हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने राजस्थानचा ३ गड्यांनी पराभव केला.

अनुभवी अजिंक्य रहाणे (७२ धावा) आणि युवा सरफराज खान यांनी मुंबईच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. सरफराजने केवळ २२ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ७३ धावांची वादळी खेळी केली. रहाणे आणि सरफराज यांनी दुसऱ्या विकेटसाठी अवघ्या ३९ चेंडूंत १११ धावांची तुफानी भागीदारी केली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+