Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

WWE स्टार 'जॉन सीना' मैदानातून निवृत्त, चाहत्यांना मोठा धक्का! रिंगला अखेरचा 'टॅप आऊट' बघा व्हिडिओ

WWE star John Cena retires Marathi news : वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE) च्या इतिहासातील एक सोनेरी पर्व आज संपुष्टात आले. 'यु कॅन्ट सी मी' चा नारा देणारा आणि तब्बल १७ वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेला WWE सुपरस्टार जॉन सीना याने आज (रविवार, १४ डिसेंबर २०२५) कुस्तीच्या रिंगमधून अधिकृत निवृत्ती जाहीर केली.

'सॅटर्डे नाईट मेन इव्हेंट'मध्ये सीना यांनी आपला शेवटचा मुकाबला 'द रिंग जनरल' गुंथर विरुद्ध केला. या अत्यंत भावनिक आणि कठोर संघर्षानंतर गुंथरने सीनाला टॅप आऊट करण्यास भाग पाडले. जवळपास २० वर्षांच्या कारकिर्दीत जाॅनसीनाला टॅप आऊट होण्याची ही पहिलीच वेळ होती, ज्यामुळे एरिनामधील चाहते निराश झाले, पण त्यांची जुनी कारकीर्द डोळ्यासमोर उभी राहिली.

WWE star John Cena retires Marathi news

जॉन सीना याचा 'अलविदा'

जॉन सीना यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आज (१४ डिसेंबर २०२५) अधिकृतरित्या निवृत्ती घेतली. याआधीच सीना याने व्हिडिओ संदेशात स्पष्ट केले होते की, WWE मधून आपण निवृत्ती घेणार आहोत पण हा निरोप त्वरित नसून, २०२५ हे वर्ष त्यांच्या कारकिर्दीतील अखेरचे असेल. या काळात ते चाहत्यांसाठी अनेक 'अंतिम' सामने खेळतील त्यानुसार, तो आज अंतीम सामना खेळला व अधिकृतरित्या निवृत्त झाला.

गुंथर विरुद्ध शेवटच्या सामन्याचा थरार आणि निकाल

आजच्या 'सॅटर्डे नाईट मेन इव्हेंट'मधील गुंथर विरुद्धचा सामना अत्यंत भावनात्म आणि ऐतिहासिक ठरला. जाॅनसीनाच्या कारकिर्दीतील प्रतिस्पर्धी कर्ट अँगल, मार्क हेनरी, रॉब वॅन डॅम, ट्रिश स्ट्रेटस आणि मिशेल मॅकूल हे दिग्गज रिंगसाईडवर उपस्थित होते. द रॉक आणि केनसह अनेकांनी सीना यांना शुभेच्छा दिल्या.

गुंथरचे सामन्यात वर्चस्व

सामन्याच्या सुरुवातीपासून 'द रिंग जनरल' गुंथरचा वरचष्मा राहिला. सीनाने 'फाइव्ह-नकल शफल' आणि 'STF' लावून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण गुंथरने नियंत्रण सोडले नाही.

'सुपर जाॅनसीना' मोड अयशस्वी

जाॅनसीनाने आपला प्रसिद्ध 'सुपर सीना' मोड वापरत 'एटिट्यूड ॲडजस्टमेंट' दिला, पण गुंथरने दोन काउंटवर किक आऊट करत चाहत्यांना निराश केले.

टॅप आऊट आणि पराभव

गुंथरने सीनावर जोरदार हल्ला केला. टेबलच्या आर-पार मारलेला 'एटिट्यूड ॲडजस्टमेंट' आणि टॉप रोपवरून केलेला 'एटिट्यूड ॲडजस्टमेंट' देखील गुंथरला हरवू शकला नाही. अखेरीस, गुंथरच्या रेसलिंग कौशल्यासमोर सीना हरले आणि जवळपास २० वर्षांच्या कारकिर्दीत प्रथमच त्यांना नम्रपणे टॅप आऊट करून पराभव स्वीकारण्यास भाग पाडले. पराभवानंतरही एरिनामधील चाहत्यांनी 'यू स्टिल गॉट इट'च्या घोषणा देत आपल्या हिरोचे समर्थन केले, कारण त्यांना माहित होते की एका महान युगाचा शेवट झाला आहे.

चाहत्यांच्या भावनांचा बांध फुटला

जॉन सीना यांच्या निवृत्तीच्या घोषणेने चाहत्यांना मोठा भावनिक धक्का बसला आहे. सोशल मीडियावर सर्वत्र "Will miss you champ" आणि "सीनाशिवाय WWE पाहणे कठीण होईल" अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आजच्या सामन्यात सीनांचा पराभव झाला असला तरी, त्यांच्या ऐतिहासिक योगदानामुळे त्यांचे नाव WWE च्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+