ICC टेस्ट रँकींगमध्ये भारताचे गुण जास्त असूनही 'हा' देश नंबर वन! असे का? वाचा कोण कितव्या स्थानी
WTC Points Table : भारतीय संघाने दिल्ली कसोटीत वेस्ट इंडीजचा अक्षरशः धुव्वा उडवला आणि विजयाचा गुलाल उधळला. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) गुणतालिकेत मात्र या 'क्लिन स्वीप'चा म्हणावा तसा फायदा टीम इंडियाला झालेला नाही! क्रिकेटचा नियम इथे गुंतागुंतीचा ठरला आहे. सर्वाधिक ५२ गुण नावावर असूनही टीम इंडिया टॉप-२ मधून बाहेर आहे.

भारतीय संघ 'या' क्रमांकावर
भारताने वेस्ट इंडीजवर दणदणीत विजय मिळवूनही, WTC च्या नवीन चक्रात सर्वाधिक सामने खेळूनही टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावर कायम राहिल्याने क्रिकेट वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. हा प्रकार भारतीय संघासाठी 'गोड पराभव' ठरला आहे.
WTC मध्ये 'गुणांचा' नाही, 'टक्केवारीचा' खेळ!
WTC च्या नियमांनुसार, क्रमवारी गुणांवर नव्हे, तर जीत टक्केवारीवर ठरते. म्हणजेच, जिंकलेल्या सामन्यांच्या एकूण गुणांची, जिंकता येणाऱ्या एकूण गुणांशी केलेली तुलना.. सर्वाधिक ५२ गुण नावावर असूनही टीम इंडिया टॉप-२ मधून बाहेर आहे आणि याचे कारण आहे 'जीत टक्केवारी'चा कठोर नियम. सर्वाधिक मेहनत करूनही अव्वल स्थानी स्थान न मिळालेल्या भारताची ही कहाणी, 'गुण जास्त तरीही क्रमांक तिसरा' अशी आहे!
भारताची स्थिती
टीम इंडियाने ७ सामने खेळले, ज्यात ४ विजय, २ पराभव आणि १ ड्रॉ आहे. यामुळे भारताने भलेही ५२ गुण कमावले, पण त्यांची 'जीत टक्केवारी' सध्या ६१.९०% आहे.
ऑस्ट्रेलियाचा धडाका
ऑस्ट्रेलियाने केवळ ३ सामने खेळले आणि तिन्ही जिंकले. त्यांचे गुण भारतापेक्षा कमी (३६) असले तरी त्यांची 'जीत टक्केवारी' १०० टक्के आहे, ज्यामुळे ते अव्वल स्थानी आहेत.
श्रीलंकेचा फायदा
श्रीलंकेने केवळ २ सामने खेळले; १ विजय आणि १ ड्रॉ. त्यांच्याकडे फक्त १६ गुण आहेत, पण त्यांची टक्केवारी ६६.६७% असल्याने ते दुसऱ्या स्थानावर आहेत. कमी सामने खेळल्याने आणि टक्केवारी चांगली राखल्याने श्रीलंकेला फायदा मिळाला आहे.
याचा अर्थ, टीम इंडियाला आता गुणतालिकेत मोठी झेप घेण्यासाठी केवळ विजय मिळवून चालणार नाही, तर बाकी संघांनी सामने गमावणे किंवा भारताला उर्वरित सामने मोठ्या फरकाने जिंकणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील आगामी मालिकेवर भारतीय चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत, कारण त्यांच्या निकालावर भारताचे स्थान अवलंबून असेल.
कोणता संघ कितव्या स्थानी वाचा..













Click it and Unblock the Notifications