WPL Final: नाणेफेक जिंकूनही दिल्लीने संधी गमावली का? प्लेईंग इलेव्हन कोणती? वाचा मॅचचे अपडेट
महिला प्रीमियर लीग- २०२५ च्या अंतिम सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकली. मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेत दिल्लीने जेव्हा-जेव्हा नाणेफेक जिंकली त्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचाच निर्णय घेतला होता. यावेळीही त्यांनी तसाच निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सच्या संघात आज एक बदल पहायला मिळाला. त्यांच्या संघातून तितस साधूला वगळण्यात आले आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यातून त्यांचा प्लेइंग इलेव्हन कायम ठेवला आहे.

दिल्लीने संधी गमावली?
या स्पर्धेत दिल्लीने जेव्हा-जेव्हा नाणेफेक जिंकली त्या-त्या वेळी गोलंदाजीचा निर्णय घेतला. रण चेस करताना त्यांना फायदा होतो, असा इतिहास आहे. मात्र मुंबईच्या बाबतीतही एक रेकाँर्ड पहायला मिळाले. गेल्यावेळी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत मुंबईने गुजरात जायंट्सचा पराभव केला होता. त्यामुळे दिल्लीच्या कर्णधाराचा गोलंदाजी करण्याचा निर्णय चुकला का, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता. या मैदानावरील रेकाँर्ड पाहता दिल्लीच्या कर्णधार मेग लॅनिंगच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
काय आहे ब्रेबॉर्नचा इतिहास?
ब्रेबॉर्न स्टेडियम नाणेफेक जिंकणाऱ्या संघांसाठी अनुकूल राहिलेले नाही. WPL च्या इतिहासात या ठिकाणी झालेल्या १४ पैकी फक्त २ सामने नाणेफेक जिंकणाऱ्या संघांनी जिंकले आहेत. WPL- २०२५ च्या एलिमिनेटर सामन्यात ही गोष्ट पुन्हा एकदा चर्चेत आली. याच मैदानावर गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला परंतु मुंबई इंडियन्सकडून ४७ धावांनी त्यांचा पराभव केला होता.
प्रथम फलंदाजीला अनुकूल?
WPL २०२५ मध्ये आतापर्यंत ब्रेबॉर्न स्टेडियमवर तीन सामने खेळले गेले आहेत आणि तिन्ही सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत. दुसऱ्या डावात दव पडल्याने लक्षणीय परिणाम झाला असला तरी, पाठलाग करणाऱ्या संघांना संघर्ष करावा लागला आहे. या आकडेवारीमुळे लॅनिंगचा अंतिम सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय एक मनोरंजक जुगार ठरतो.
मुंबई इंडियन्सचा प्लेइंग इलेव्हन
यास्तिका भाटिया, हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), सजीवन सजाना, अमेलिया केर, अमनजोत कौर, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, सायका इशाक.
दिल्ली कॅपिटल्सचा प्लेइंग इलेव्हन
मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेस जोनासेन, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲनाबेल सदरलँड, मारिझान कॅप, सारा ब्राइस, निकी प्रसाद, मिन्नू मणी, शिखा पांडे, नल्लापुरेड्डी चरणी.












Click it and Unblock the Notifications