Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

WPL 2025, UPW vs RCB : युपी वाँरिअर्सचा धावांचा डोंगर; आरसीबीला कराव्या लागणार २२६ धावा

वुमन्स प्रीमियर लीग २०२५ च्या आजच्या सामन्यांत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि युपी वॉरियर्स हे संघ आमनेसामने आले. नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा हा निर्णय योग्य ठरला नाही. स्पर्धेचा शेवट गोड करण्याच्या उद्देशाने युपी वाँरिअर्सचा संघ फलंदाजीला आला. ग्रेस हॅरिस आणि जॉर्जिया वोल या जोडीने आक्रमक सुरुवात केली. निर्धारीत २० षटकांत युपीने २२५ धावांचा डोंगर उभा केला.

UP vs RCB

युपीची आक्रमक फलंदाजी

नाणेफेक गणावून मैदानात उरलेल्या युपीच्या संघाने जोरदार बॅटिंग केली. ग्रेस हॅरिस आणि जॉर्जिया वोल या जोडीने पहिल्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी केली. त्यानंतर किरण नवगिरेने १६ चेंडूत ५ षटकार आणि २ चौकाराच्या मदतीने ४६ धावा कुटल्या. तिचं अर्धशतक ४ धावांनी हुकलं. त्यानंतर आलेली चिनले हेन्री (१९) काही खास करू शकली नाही. युपी वॉरियर्सने २० षटकात ५ गडी गमवून २२५ धावा केल्या. तसेच विजयासाठी २२६ धावांचे लक्ष दिले.

वोलचं शतक हुकलं

या सामन्यात जॉर्जिया वोलचं शतक अवघ्या एका धावेने हुकलं. शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेताना दीप्ती शर्माने तिला धावचीत केलं. या स्पर्धेतील तिचं पहिलं शतक होता होता राहिलं. जॉर्जियाने ५६ चेंडूत १७ चौकार आणि १ षटकार मारत नाबाद ९९ धावा केल्या.

आरसीबीसमोर करो या मरो

आरसीबीकडून जॉर्जिया वारेहमने सर्वात चांगला स्पेल टाकला. तिने ४ षटकात ४३ धावा देत २ गडी बाद केले. या व्यतिरिक्त एकही गोलंदाज खास कामगिरी करू शकला नाही. आरसीबीने हा सामना गमावला तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. कारण आरसीबीला टॉप ३ मध्ये स्थान मिळवण्यासाठी दोन सामने जिंकणं भाग आहे. आता आरसीबीचे ४ गुण आहेत. तर मुंबई इंडियन्सचे ८ गुण आहेत. त्यामुळे नेट रनरेटच्या जोरावर टॉप ३ मध्ये स्थान मिळवण्याची शक्यता आहे. पण आज पराभव झाला तर हे गणित काही सुटणार नाही.

कसे आहेत दोन्ही संघ

यूपी वॉरियर्स महिला (प्लेइंग इलेव्हन): ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वॉल, किरण नवगिरे, दीप्ती शर्मा (कर्णधार), चिनेल हेन्री, श्वेता सेहरावत, पूनम खेमनार, उमा चेत्री (विकेटकीपर), सोफी एक्लेस्टोन, क्रांती गौड, अंजली सरवानी.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रघवी बिस्ट, रिचा घोष (विकेटकीपर), कनिका आहुजा, शार्लोट डीन, जॉर्जिया वेरेहम, किम गर्थ, स्नेह राणा, रेणुका सिंग ठाकूर.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+