Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

WPL 2025: युपीचा आरसीबीवर मोठा विजय! 'हे' 2 संघ डब्ल्युपीएलमधून बाहेर, 'हे' 3 संघ पोहचले प्लेऑफमध्ये

WPL 2025 UP Warriors win over RCB : महिला प्रीमियर लीग (WPL) मधील शेवटच्या सामन्यात 8 मार्च 2025 रोजी यूपी संघाने शानदार विजय मिळविला आहे. आरसीबीविरुद्ध खेळताना यूपीने WPL इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या केली. यूपीने हा सामना 12 धावांनी जिंकला, परंतु असे असतानाही दोन्ही संघांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.

युपी संघाने सुरुवातीला फारशी चांगली कामगिरी केली नाही,निराशाजनक कामगिरीची मालिकाच त्यांची सुरु होती पण कालच्या सामन्यात युपीने आपला खेळ उंचावून विजय साजरा केला असला तरीही त्यांच्यावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की आली आहे.

WPL 2025 UP Warriors win over RCB

यूपी वॉरियर्सने रचली सर्वोच्च धावसंख्या

जॉर्जिया वॉल या विजयाची हिरो होती, तिने 99 धावांची शानदार नाबाद खेळी खेळली. तिचे शतक हुकले, पण सर्वोच्च धावसंख्येच्या विक्रमात तिच्या नावावर नोंद झाली आहे. जॉर्जियाच्या खेळीमुळे यूपी संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेण्यात मदत झाली.यूपी वॉरियर्सने शानदार फलंदाजी करत 225 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले, जे आतापर्यंतच्या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या होती.

ॲलिस पॅरीने 15 चेंडूत 28 धावा

ॲलिस पॅरीने 15 चेंडूत 28 धावा, एस मेघनाने 12 चेंडूत 27 धावा केल्या आणि स्नेह राणाने सहा चेंडूत 26 धावा करत संघाला विजय मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, अखेर यूपी वॉरियर्सच्या गोलंदाजीसमोर आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला.

3 संघ प्लेऑफसाठी पात्र

या पराभवासह विद्यमान चॅम्पियन राॅयल चॅलेंजर बंगळुरूचा संघ WPL 2025 मधून बाहेर पडला आहे. आरसीबी संघाने सलग पाच सामने गमावले आहेत, तर तीन संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये दिल्ली, गुजरात आणि मुंबईच्या संघांचा समावेश आहे.

मुंबई इंडियन्सला थेट फायलन गाठण्याची संधी

WPL 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघ प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करणारा पहिला होता, तर गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्सचे संघ UP Warriors vs RCB सामन्यानंतर प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. आता तीन संघांपैकी कोणता संघ अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करेल, हे मुंबई इंडियन्सच्या साखळी टप्प्यातील उर्वरित 2 सामन्यांच्या निकालावरच ठरणार आहे. म्हणजेच दोन्ही मॅच जर मुंबईने जिंकले तर थेट या संघाला फायनलमध्ये पोहचण्याची संधी आहे. सध्या दिल्ली कॅपिटल्स संघ 8 सामन्यांत 5 विजय मिळवून 10 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.

युपी वाॅरियर्स महिला टीम - ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वोल, किरण नवगिरे, दीप्ती शर्मा (कर्णधार), चिनेल हेन्री, श्वेता सेहरावत, पूनम खेमनार, उमा खेमनार, उमा खेमनार (विकेटकिपर), सोफी एक्लेस्टोन, क्रांती गौड़, अंजली सरवानी.

आरसीबी महिला संघ : स्मृती मानधना (कर्णधार), सब्बिनेनी मेघना, एलिस पेरी, राघवी बिस्ट, रिचा घोष (यष्टीरक्षक), कनिका आहुजा, जॉर्जिया वेरेहम, चार्लोट डीन, किम गर्थ, स्नेह राणा, रेणुका सिंह ठाकूर

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+