Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

WPL 2025 : ऑरेंज कॅप व पर्पल कॅपच्या स्पर्धेत सध्या कोण? यापुर्वी कुणी जिंकलीय? वाचा...

महिला प्रीमियर लीग- २०२५ चा हंगाम सुरू आहे. अंतिम सामना १५ मार्च रोजी मुंबईत खेळवला जाणार आहे. महिला प्रीमियर लीगचा हा तिसरा हंगाम असून ही जगातील सर्वात मोठी महिला टी-२० फ्रँचायझी आधारित स्पर्धा बनली आहे. कोणता संघ फायनल जिंकेल याची जेवढी चर्चा सुरु आहे, तेवढीच चर्चा ऑरेंज कॅप व पर्पल कॅप कुणाकडे येईल, याचीही सुरु आहे. सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक बळी घेणाऱ्या खेळाडूला या कॅप दिल्या जातात.

Women s Premium League-2025

नताली आहे चर्चेत

ऑरेंज कॅपसाठी सध्या मुंबई इंडियन्सची नताली सायव्हर-ब्रंट आघाडीवर आहे. तिने तीन सामन्यांमध्ये १७९ धावांसहअव्वल स्थान पटकाविले आहे .इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये ज्याप्रमाणे ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप असते, त्याचप्रमाणे डब्ल्यूपीएलमध्येही या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या आणि सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंना दिल्या जातात.

कुणी मिळवलीय ऑरेंज कॅप?

ऑस्ट्रेलियाची अनुभवी खेळाडू मेग लॅनिंगने २०२३ मध्ये पहिल्यांदाच WPL मध्ये ऑरेंज कॅप मिळवली होती. जेव्हा तिने नऊ सामन्यांमध्ये ३४५ धावा केल्या. WPL २०२४ मध्ये एलिस पेरीने नऊ सामन्यांमध्ये ३४७ धावा केल्या आणि तिच्या संघाला जेतेपदापर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच वेळी, तिची सहकारी मेग लॅनिंग, जी दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार आहे, तिने २०२३ आणि २०२४ दोन्ही हंगामात संघाला उपविजेतेपद मिळवून दिले परंतु ऑरेंज कॅप जिंकण्यास ती हुकली. भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, शेफाली वर्मा WPL मध्ये ऑरेंज कॅप जिंकण्याच्या अगदी जवळ पोहोचली आहे. शेफालीने WPL २०२४ मध्ये नऊ सामन्यांमध्ये ३०९ धावा करून तिसरे स्थान पटकावले होते. दुसरीकडे, भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांनी २०२३ आणि २०२४ च्या हंगामात अनुक्रमे चौथे स्थान मिळवले पण त्यांनाही कॅप मिळण्यापासून वंचित राहावे लागले.

पर्पल कॅपसाठी कोण चर्चेत?

सध्या जॉर्जिया वेअरहॅमने 3 सामन्यांमध्ये 7 विकेट्ससह आत्तापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहे. गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. २०२३ मध्ये पहिल्या WPL हंगामात वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू हेली मॅथ्यूजने पर्पल कॅप जिंकली होती. तिने १० सामन्यांमध्ये १६ विकेट्स घेतल् होत्या आणि मुंबई इंडियन्सला जेतेपदापर्यंत पोहोचवले. भारतीय फिरकी गोलंदाज श्रेयंका पाटीलने WPL २०२४ मध्ये ८ सामन्यात १३ विकेट्स घेत पर्पल कॅप जिंकली कारण स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजेतेपद जिंकले. पाटीलने आरसीबीच्या सहकारी आशा शोबाना आणि सोफी मोलिनेक्स यांना मागे टाकले, ज्यांनी १० सामन्यांमध्ये प्रत्येकी १२ बळी घेतले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+