WPL 2025: डब्ल्युपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा युपीवर विजय; जाणून घ्या गुणतालिकेत कोण कितव्या स्थानी?
Wpl 2025 mumbai indians vs up warriorz : महिला प्रीमियर लीगमधील कालचा सामना मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरीर्स या संघांमध्ये खेळला गेला. मुंबई इंडियन्सने हा सामना सहज जिंकला. प्रथम फलंदाजी करताना यूपीने 9 बाद 150 धावा केल्या. प्रत्युत्तरात खेळताना मुंबईने 4 बाद 153 धावा करत सामना जिंकला.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर जॉर्जिया वोल आणि ग्रेस हॅरिस यांनी मिळून यूपीसाठी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. दरम्यान, हॅरिस 28 धावा करून बाद झाली. जॉर्जियाने अर्धशतक ठोकले आणि 33 चेंडूत 55 धावा केल्या. दीप्ती शर्मानेही 27 धावांची खेळी केली आणि यूपीने 9 विकेट्सवर 150 धावा केल्या.

हेली मॅथ्यूजच्या 46 चेंडूत 68 धावा
मुंबई इंडियन्सकडून अमेलिया केरने अप्रतिम गोलंदाजी करत 5 बळी घेतले. प्रत्युत्तरात खेळताना हेली मॅथ्यूजने मुंबईत खळबळ उडवून दिली. हेली मॅथ्यूजने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले आणि 46 चेंडूत 68 धावा केल्या. नताली सीव्हर ब्रंटनेही 37 धावांची खेळी केली आणि मुंबईने 19 व्या षटकात 4 गडी गमावून सामना जिंकला. मुंबईचा या मोसमातील हा चौथा विजय आहे.
Wpl 2025 अमेलिया कारने शानदार गोलंदाजी
अमेलिया कारने शेवटच्या षटकात दोन खेळाडू बाद केले आणि चार षटकात 38 धावा देत पाच खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवून कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली. डब्ल्यूपीएलमधील ही तिची सर्वोत्तम कामगिरी आहे. मॅथ्यूजने 25 धावांत दोन गडी बाद केले. ब्रंटने जोझियाला आपला शिकार बनवले आणि पारुनिका सिसोदियाने प्रत्येकी एक विकेट घेतली. यूपी वॉरियर्सने शेवटच्या 12.1 षटकात केवळ 76 धावांत नऊ विकेट गमावल्या.
महिला प्रिमियर लिग 2025 - पाॅईंट टेबल
- दिल्ली कॅपीटल्सने 7 पैकी 5 मॅच जिंकले 2 हरले हा संघ 10 अंक मिळवत पहिल्या स्थानी आहे.
- मुंबई इंडियन्सने 6 पैकी 4 मॅच जिंकले 2 हरले हा संघ 8 अंक मिळवत दुसऱ्या स्थानी आहे.
- गुजराट जायंट्स संघाने 6 पैकी 3 मॅच जिंकले 3 हरले हा संघ 6 अंक मिळवत तिसऱ्या स्थानी आहे.
- राॅयल चॅलेंजर बंगळुरुने 6 पैकी 2 मॅच जिंकले 4 हरले हा संघ 4 अंक मिळवत चौथ्या स्थानी आहे.
- युपी वाॅरियर्सने 7 पैकी 2 मॅच जिंकले 5 हरले हा संघ 4 अंक मिळवत तळाच्या स्थानी आहे.












Click it and Unblock the Notifications