Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

MI vs GG : हॅली मॅथ्यूज-नॅट सायव्हर ब्रंटची स्फोटक खेळी; गुजरातची हार, मुंबई इंडियन्स फायनलमध्ये

महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात एलिमिनेटर सामना खेळला गेला आणि मुंबईच्या बॅटिंग युनिटने एकच गोंधळ घातला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 3 गडी गमावून 213 धावा केल्या. गुजरातला लक्ष्य गाठता आले नाही आणि मुंबईने विजय मिळवत दुसऱ्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.

महिला प्रीमियर लीग- २०२५ च्या एलिमिनेटर प्ले-ऑफ सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यात सामना झाला. मुंबईने दिलेल्या 214 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात जायंट्स (GG) ने पॉवरप्लेमध्ये बेथ मूनी, हरलीन देओल आणि कर्णधार अ‍ॅशले गार्डनर यांच्या मोठ्या विकेट गमावल्या.

Mumbai Indians- Gujarat Giants Live Score

तत्पुर्वी मुंबई इंडियन्सकडून हेली मॅथ्यूज आणि नॅट सायव्हर-ब्रंटने प्रत्येकी 77 धावा केल्या, तर कर्णधार हरमनप्रीत कौरने शेवटी 12 बॉलमध्ये 36 धावांसह आपली ताकद दाखवली. दरम्यान फलंदाजी करताना गुजरात संघ मोठ्या लक्ष्याचे दडपण सहन करू शकला नाही आणि 166 धावांवर आटोपला. मुंबईकडून हेली मॅथ्यूजने 3 बळी घेतले.

मुंबईने या स्पर्धेत दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. आता 15 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात अंतिम फेरी होणार आहे. विजेत्या संघाचा अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (DC) शी सामना होईल. शेवटच्या लीग सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) कडून पराभव झाल्यानंतर मुंबई इंडियन्स अंतिम फेरीत थेट पात्रता गमावली. गुजरात जायंट्स त्यांचा पहिला प्लेऑफ सामना खेळत आहे, मागील दोन्ही हंगामात शेवटच्या स्थानावर राहिला आहे.

मुंबईने दिले होते 214 धावांचे आव्हान

मुंबई इंडियन्सने वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील तिसऱ्या हंगामात (WPL 2025) एलिमिनेटर सामन्यात गुजरात जायंट्सला विजयासाठी 214 धावांचं आव्हान दिले. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 213 धावा केल्या. मुंबईच्या पहिल्या चारही फलंदाजांनी शानदार बॅटिंग केली. मुंबईसाठी हॅली मॅथ्यूज आणि नॅट सायव्हर ब्रँट या दोघींनी सर्वाधिक आणि प्रत्येकी 77 धावांची खेळी केली. तसेच अखेरच्या क्षणी कर्णधार हरमनप्रीत कौर हीने 36 धावांची वादळी खेळी करत मुंबईला 213 धावांपर्यंत पोहचवलं. हे आव्हान गुजरात पेलू शकले नाही आणि त्यांचा पराभव झाला.

कशी राहिली मुंबईची बॅटिंग

गुजरातने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंईने या संधीचा चांगला फायदा घेतला. यास्तिका भाटीया आणि हॅली मॅथ्यूज या दोघींनी 26 धावांची सलामी भागीदारी केली. यास्तिका 15 धावांवर बाद झाली. त्यानंतर हॅली आणि नॅट सायव्हर ब्रँट या दोघींनी झंझावाती खेळी करत शतकी भागीदारी केली. तसेच या दरम्यान वैयक्तिक अर्धशतकही झळकावलं. मात्र दोघीही एकाच धावसंख्येवर बाद झाल्या. हॅली आणि मॅथ्यूज या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी केली. मात्र हॅली त्यानंतर आऊट झाली. हॅलीने 50 बॉलमध्ये 10 फोर आणि 3 सिक्ससह 77 धावा केल्या. हॅलीनंतर नॅट बाद झाली. नॅटने 41 चेंडूत 2 षटकार आणि 10 चौकारांसह 77 रन्स केल्या.

कौरचे 4 सिक्स 2 फोर

कर्णधार हरमनप्रीत कौर बॅटींगला आल्यावर तिने आपली ताकद दाखवून दिली. हरमनप्रीतने 12 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 2 फोरसह 36 रन्स केल्या. त्यामुळे मुंबईला 210 पार मजल मारता आली. तर सजीवन सजना हीने 3 चेंडूत नाबाद 1 धाव करत हरमनप्रीतला चांगली साथ दिली. गुजरातकडून डॅनियल गिब्सन हीने 2 विकेट्स घेतल्या. तर काशवी गौतमने एकमेव विकेट मिळवली.

मुंबई इंडियन्स इलेव्हन: हेली मॅथ्यूज, अमेलिया केर, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (क), अमनजोत कौर, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), सजीवन सजना, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, सायका इशाक

गुजरात जायंट्स संघ: बेथ मुनी (विकेटकीपर), काश्वी गौतम, हरलीन देओल, अ‍ॅशले गार्डनर (कर्णधार), फोबी लिचफिल्ड, डॅनिएल गिब्सन, भारती फुलमाळी, सिमरन शेख, तनुजा कंवर, मेघना सिंग, प्रिया मिश्रा.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+