दिल्ली कॅपिटल्स विरुध्द मुंबई इंडियन्स, कोणाचा पगडा भारी, हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घ्या
WPL 2025 Final DEL-W vs MUM : WPL 2025 च्या अंतिम सामन्यात आज (ता.15 मार्च) रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुध्द मुंबई इंडियन्स आमनेसामने येणार आहेत. आज शनिवारी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे.
गट टप्प्याच्या शेवटी पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवल्यानंतर मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. दिल्ली कॅपिटल्स महिला संघाने लीग टप्प्यात वर्चस्व गाजवले आणि आठ सामन्यांमध्ये पाच विजय आणि तीन पराभवांसह महिला प्रीमियर लीग पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. 2023 आणि 2024 मध्ये सलग महिला प्रीमियर लीग फायनल गमावल्यानंतर दिल्लीचा संघ तिसरा फायनल खेळणार आहे.

खेळपट्टीचा फायदा कोणाला होणार?
कॅपिटल्सने वडोदरा येथे झालेला पहिला सामना दोन विकेट्सने आणि बंगळुरू येथे झालेला दुसरा सामना नऊ विकेट्सने सामना जिंकला होता. ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 197 आहे. तिन्ही सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत.
DEL-W vs MUM हेड टू हेड रेकॉर्ड
महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने वरचढ कामगिरी केली आहे. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये अंतिम फेरीत सामना झाला. त्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजय मिळवला. पण एकंदरीत दिल्लीचा वरचष्मा आहे. दोन्ही संघांनी आपापसात 7 सामने खेळले आहेत, त्यापैकी दिल्लीने चार वेळा विजय मिळवला आहे.
ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स महिला आणि मुंबई इंडियन्स महिला यांच्यातील हा दुसरा महिला प्रीमियर लीग सामना असेल. या मैदानावरील शेवटच्या सामन्यात, मुंबई इंडियन्स महिला संघाने महिला प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत विजय मिळवला आहे.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संभाव्य प्लेइंग 11
दिल्ली कॅपिटल्स महिला: मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेस जोनासेन, जेमिमा रॉड्रिग्ज, अॅनाबेल सदरलँड, मॅरिझाने कॅप, सारा ब्राइस (यष्टीरक्षक), निकी प्रसाद, मिन्नू मणी, शिखा पांडे, टायटस साधू/एन चरणी
मुंबई इंडियन्स महिला: हेली मॅथ्यूज, अमेलिया केर, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमनजोत कौर, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), सजीवन सजना, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनम इस्माईल, सईका इशाक/पारुणिका सिसोदिया.












Click it and Unblock the Notifications