Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

धोनीच्या आयपीएल पगारापेक्षा डी गुकेश भरणार जास्त कर, जाणून घ्या किती रक्कम भरावी लागेल

world chess champion d gukesh : भारताच्या डी गुकेशने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यानंतर तो मागील काही दिवसांपासून सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. त्याला मिळालेल्या बक्षीसाची रक्कम किती आहे. त्याला किती टॅक्स भरावा लागणार याबद्दल बरीच चर्चा सुरु आहे.

डी गुकेशला बक्षीस म्हणून मोठी रक्कम मिळाली आहे. यावर गुकेशलाही आता कर भरावा लागणार आहे. ही रक्कमही करोडोंमध्ये असणार आहे. जी महेंद्रसिंग धोनीचा आयपीएलचा पगार पेक्षा जास्त असणार आहे. डी गुकेशला यावेळी आयपीएलमध्ये धोनीच्या पगारापेक्षा जास्त कर भरावा लागणार आहे. रिपोर्टवर विश्वास ठेवला तर गुकेशला कर म्हणून 4.67 कोटी रुपये भरावा लागणार आहे. दुसरीकडे महेंद्रसिंग धोनीचा आयपीएलचा पगार केवळ 4 कोटी रुपये आहे.

d gukesh on ms dhoni

धोनीचा या हंगामात अनकॅप्ड खेळाडू म्हणून चेन्नई सुपर किंग्जमध्ये समावेश करण्यात आला होता. गुकेशने फायनलमध्ये चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून बुद्धिबळ विश्वात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. टॅक्सनंतर त्याची बक्षीसाची रक्कम केवळ 6 कोटी रुपयांपर्यंत येऊ शकते. भारतात 15 लाख रुपयांनंतर 30 टक्के कर लागतो. 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेनंतर, 37% पर्यंत टॅक्स लागू होतो. यामुळे गुकेशलाही कर भरावा लागतो. बक्षीस रक्कम जास्त असल्याने आयकराची रक्कमही वाढली आहे.

गुकेशने म्हटलं आहे की, मी कधीही पैशासाठी बुद्धिबळ खेळलो नाही. खेळातून पैसे मिळवणे हा माझा हेतू नव्हता. जेव्हा मी चेसमध्ये आलो तेव्हा कुटुंबालाही कठीण निर्णय घ्यावे लागले. माझे पालक वाईट आर्थिक परिस्थितीतून गेले आहेत. आम्ही आता आरामात आहोत आणि पालकांना याचा काही विचार करण्याची गरज पडत नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+