महिला विश्वचषक जिंकल्यावर टीम इंडियावर 'पैशांचा पाऊस'! भारतासह कोणत्या संघाला किती रक्कम मिळाली,वाचा
Womens world cup 2025 india win record prize money : मुंबईच्या डीवाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये रविवारचा दिवस भारतीय महिला क्रिकेट संघाने सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवला. महिला क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच वर्ल्ड कपचा किताब जिंकून टीम इंडियाने केवळ इतिहासच रचला नाही, तर आर्थिक आघाडीवरही एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर बक्षिसांच्या रकमेचा अक्षरश: पाऊस पडला आहे. ही रक्कम महिला विश्वचषकाच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी बक्षीसाची रक्कम ठरली आहे!

भारताच्या ऐतिहासिक विजयाचा थरार
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ७ विकेट्स गमावून २९८ धावांचा डोंगर उभा केला. या धावसंख्येमध्ये शेफाली वर्मा हिने ८७ धावांची तुफानी खेळी केली, तर दीप्ती शर्मा हिनेही धमाकेदार अर्धशतक ठोकले. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ २४६ धावांवर ऑल आऊट झाला. गोलंदाजीतही दीप्ती शर्माने पुन्हा कमाल दाखवत ५ महत्त्वपूर्ण बळी घेत दक्षिण आफ्रिकेचे कंबरडे मोडले.
अंतीम सामना, स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू
- प्लेअर ऑफ द मॅच (Player of the Match): शेफाली वर्मा (Shafali Verma)
- प्लेअर ऑफ द टूर्नामेंट (Player of the Tournament): दीप्ती शर्मा (Deepti Sharma)
टीम इंडियाला मिळालेली विक्रमी बक्षीस रक्कम
भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर 'प्राइज मनी' च्या स्वरूपात मिळालेली रक्कम ही महिला क्रिकेट विश्वचषकातली आजवरची सर्वात मोठी रक्कम आहे.
संघ बक्षीसाची रक्कम
- भारत - विजेता ₹ ४१.७७ कोटी
- दक्षिण आफ्रिका - उपविजेता ₹२१.८८ कोटी
- ऑस्ट्रेलिया - ₹११.९५ कोटी
- इंग्लंड - ₹११.९५ कोटी
- श्रीलंका - ₹७.८ कोटी
- न्यूजीलैंड - ₹७.८ कोटी
- बांग्लादेश - ₹४.५ कोटी
- पाकिस्तान - ₹४.५ कोटी
-
अशोक खरातचा 'खेळ' खल्लास? एसआयटीच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications