IND vs WI : टी- 20 मध्ये वुमेन्स टीम इंडियाच्या सर्वोच्च धावा, विंडीजसमोर 218 धावांचं आव्हान
भारत- वेस्टइंडिज या दोन्ही संघात सुरु असलेल्या टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या आजच्या तिसऱ्या सामन्यात भारताने अनेक रेकाँर्ड केले. कर्णधार स्मृती मंधना हिने टी-२० मधील २९ अर्धशतकांचा सुझी बेट्स हिची विक्रम मोडला. स्मृतिने आजच्या सामन्यात तिचे वैयक्तीक ३० वे अर्धशतक झळकावले. या सामन्यात भारताने आत्तापर्यंतच्या सर्वाधिक २१८ धावा केल्या.

आजच्या सामन्याकडे लक्ष
भारत-वेस्ट इंडिज संघामध्ये सुरु असलेल्या मालिकेचा आजचा तिसरा सामना आहे. यापूर्वी दोन्ही संघाने १-१ अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे आजच्या सामन्याला विशेष महत्व आले आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय महिला क्रिकेट संघाने २१८ धावा केल्या. कर्णधार स्मृती मंधाना आणि रिचा घोष या दोघींच्या विस्फोटक अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने हा टप्पा गाठला. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 217 धावा केल्या.
ठरली सर्वोच्च धावसंख्या
वूमन्स टीम इंडियाची ही टी- 20 इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. स्मृती मंधाना हीने नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये खेळविण्यात येत असलेल्या या सामन्यात 47 चेंडूंमध्ये 13 चौकार आणि 1 षटकारासह एकूण 77 धावांची खेळी केली. स्मृतीचं हे सलग तिसरं आणि टी- 20 तील ३० वे अर्धशतक ठरले. स्मृतीने यासह सुझी बेट्स हीच्या सर्वाधिक 29 टी 20I अर्धशतकांचा विश्व विक्रम मोडीत काढला. त्यानंतर रिचा घोष हीने वादळी खेळी केली. रिचाने अवघ्या 18 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. रिचा टी 20I क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक करणारी संयुक्तरित्या तिसरी महिला फलंदाज ठरली. जेमिमाह रॉड्रिग्स हीने 39 धावा केल्या. तर राघवी बिष्ट आणि सजीवन सजना दोघी नाबाद परतल्या. राघवीने 22 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 2 फोरसह नॉट आऊट 31 रन्स केल्या. तर सजीवन 4 धावांवर नाबाद परतली. विंडीजकडून चौघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
वूमन्स वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन : हेली मॅथ्यूज (कर्णधार), कियाना जोसेफ, शेमाइन कॅम्पबेल (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, नेरिसा क्राफ्टन, शबिका गजनाबी, आलिया ॲलेने, झैदा जेम्स, एफे फ्लेचर आणि करिश्मा रामहारक.
वूमन्स टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : स्मृती मानधना (कर्णधार), उमा चेत्री, जेमिमाह रॉड्रिग्स, रघवी बिस्ट, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), सजीवन सजना, राधा यादव, सायमा ठाकोर, तितास साधू आणि रेणुका ठाकूर सिंग.












Click it and Unblock the Notifications