Women T20 World Cup 2024 : आजपासून महिला टी 20 विश्वचषक जाणून घ्या भारतीय सामन्यांचे वेळापत्रक
Women T20 World Cup 2024 : महिला टी20 विश्वचषक स्पर्धा आजपासून UAE कप सुरू होत आहे. बांग्लादेश स्काॅटलंडदरम्यान सलामीची लढत होत असून उद्या भारताचा सामना होणार आहे. या स्पर्धेबद्दल भारतीय चाहत्यांमध्ये प्रचंड स्पर्धा असून सर्वात महत्वाचे म्हणजे पाकिस्तानशी सामना कधी आहे हे क्रीडा चाहते जाणून घेत आहेत.
महिला टी 20 विश्वचषकातील वेळापत्रक, भारताचे सामने कधी होणार आणि ते ते कोणत्या चॅलनवर बघायचे हे आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.

भारताचा सामना या तारखेला
हा सामना बांगलादेश आणि स्कॉटलंड यांच्यात होणार आहे. टीम इंडियाच्या मॅचबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. भारताचा पहिला सामना न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना चार ऑक्टोबरला होणार आहे. सर्वात महत्त्वाचा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सहा ऑक्टोबरला सामना होणार आहे. हा बहुप्रतिक्षित सामना रोमांच आणि उत्साहाने भरलेला असेल.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघ सर्वाधिक यशस्वी ठरला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने सहा वेळा विजेतेपद पटकावले आहे. त्यानंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडिजच्या संघांची नावे येतात. दोन्ही संघांनी प्रत्येकी एकदा जेतेपद पटकावले आहे. भारतीय संघाला या यादीत आपले नाव नोंदवायचे आहे.
2020 च्या T20 विश्वचषकात टीम इंडिया उपविजेती
2020 च्या T20 विश्वचषकात टीम इंडिया उपविजेती ठरली होती. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने 24 सप्टेंबर 2024 रोजी यूएईला रवाना होत असताना मीडियाशी संवाद साधला आणि तिची मते आणि अपेक्षा शेअर केल्या. न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका यांसारख्या बलाढय़ संघ आणि गतविजेता ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्धच्या लढतींसह भारताची मोहीम आव्हानात्मक आणि रोमांचकही असणार आहे.
महिला T20 विश्वचषक स्पर्धेतील भारताचे वेळापत्रक
- भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई (4 ऑक्टोबर)
- भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई (6 ऑक्टोबर)
- भारत वि. श्रीलंका, दुबई (9 ऑक्टोबर)
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शारजाह (13 ऑक्टोबर)
- 1ली सेमीफायनल 1 दुबई (17 ऑक्टोबर)
- 2रा सेमीफायनल 2 शारजाह (18 ऑक्टोबर)
- फायनल दुबई (20 ऑक्टोबर)
येथे पाहा सामने
सामन्यांचे थेट प्रक्षेपण थेट सामने संबंधित आहेत, त्यामुळे ते स्टार स्पोर्ट्सवर थेट पाहता येतील. याशिवाय हा सामना ओटीटीवरही प्रसारित केला जाईल. या सामन्याचे डिस्ने + हॉटस्टार वर थेट प्रक्षेपण देखील केले जाईल. वेळ दुपारी 3:30 आणि 7:30 आहे.












Click it and Unblock the Notifications