Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारतीय संघ आज मैदानावर उतरताना काळी पट्टी बांधून का उतरला, कारण आलं समोर, 'या' महान खेळाडूला...

ind Vs Aus Semi final : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा टॉस दरम्यान काळी पट्टी घालून आला. त्यानंतर मैदानावर भारतीय संघाचे संपूर्ण खेळाडूंच्या हाताला काळी पट्टी बांधलेली दिसली. त्याचे कारण आला समोर आले आहे. भारतीय संघातील खेळाडूंनी एका महान ज्येष्ठ खेळाडूला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व त्यांच्या सन्मानार्थ ही काळी पट्टी बांधली होती.

खरंतर, भारतीय खेळाडू मुंबईचे महान फिरकीपटू पद्माकर शिवलकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय खेळाडूंनी आज काळी पट्टी डाव्या हाताच्या खांद्याला बांधली होती. पद्माकर शिवलकर यांचे वयाच्या 84 व्या वर्षी सोमवारी निधन झाले होते. तर आज दुसऱ्या दिवशी दुबई येथे सुरु असलेल्या सेमी फायनलमध्ये भारतीय खेळाडूंनी त्यांना सन्मानार्थ हा निर्णय घेतला.

ind Vs Aus Semi final

कोण होते पद्माकर शिवलकर?

भारतासाठी कधीही न खेळलेल्या सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक असलेल्या शिवलकर यांनी 1961-62 ते 1987-88 दरम्यान एकूण 124 प्रथम श्रेणी सामने खेळले आणि 19.69 च्या सरासरीने 589 विकेट्स घेतल्या. 2017 मध्ये त्यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सीके नायडू 'जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित केले.

मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) चे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, 'मुंबई क्रिकेटने सोमवारी एक खरा दिग्गज गमावला आहे. पद्माकर शिवलकर सरांचे खेळातील योगदान, विशेषतः सर्वकालीन महान फिरकीपटूंपैकी एक म्हणून, नेहमीच लक्षात ठेवले जाईल. त्यांचे समर्पण, कौशल्य आणि मुंबई क्रिकेटवरील प्रभाव अतुलनीय आहे. त्यांच्या निधनाने क्रिकेट जगताचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

सुनील गावस्करांनी अर्पण केली श्रद्धांजंली

दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी स्व. पद्माकर शिवलकर यांना भावनिक श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, 'काही जण इतरांपेक्षा भारतीय संघात खेळण्यास अधिक पात्र होते'. डावखुरा फिरकी गोलंदाज शिवलकर हे देशातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक होते. ज्यांना कधीही राष्ट्रीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही.

काही दिवसांपासून होते आजारी!

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, महान खेळाडू पद्माकर शिवलकर यांना वयाोमानुसार काही आरोग्याच्या समस्या होत्या. त्यांना रुग्णालयात उपचार सुरू होते. तर त्यांचे सोमवारी मुंबई येथे निधन झाले. शिवलकर यांच्या निधनावर गावस्कर यांनी भावनिक संदेश लिहिला. 19 फेब्रुवारी रोजी मुंबईचे माजी कर्णधार आणि मुख्य निवडकर्ता मिलिंद रेगे यांच्या निधनानंतर काही दिवसांनी शिवलकर यांचे निधन झाले.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+