Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सिडनीतील सामना शेवटचा..? रोहित शर्माच्या निवृत्तीची चर्चा, काय आहे खरं कारण...

आर आश्विनच्या निवृत्तीनंतर रोहित शर्मा व विराट कोहलीच्या निवृत्तीची चर्चा सुरु झाली होती. या दोन्ही स्टार फलंदाजांबाबत रोज नवनवे अंदाज बांधले जात होते. मात्र आता एका रोहित शर्मा सिडनी टेस्टनंतर खरोखर निवृत्तीची घोषणा करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे रोहित शर्मा वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीप खेळेल, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. आता हे अंदाज का सुरु झालेत, हे आपण पाहूयात...

Rohit Sharma

टीम इंडियाचा पराभव

सध्या ऑस्ट्रेलियात बाँर्डर-गावस्कर ट्राँफीचे सामने सुरु आहेत. मेलबर्न कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. या सामन्यात १८४ धावांनी ऑस्ट्रेलियाने भारताला पराभवाची धूळ चारली. एक वेळ हा सामना अनिर्णित ठेवण्याची संधी भारताला होती. मात्र ऋषभ पंत बाद झाल्यानंतर भारताचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. यशस्वी जैस्वाल वगळता एकाही खेळाडूला चमक दाखवता आली नाही. रोहित शर्मा व विराट कोहली हे स्टार फलंदाजही मोक्याच्या क्षणी चालले नाहीत. त्यानंतर मात्र रोहित शर्माच्या निवृत्तीच्या बातम्यांनी वेग धरला.

कधी घेणार निवृत्ती

मेलबर्न कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतर खऱ्या अर्थाने रोहित शर्माच्या निवृत्तीच्या बातम्या समोर येऊ लागल्या. मिडिया रिपोर्ट्सनुसार टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेईल. सिडनी टेस्टनंतर रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो. त्यामुळे आता सिडनीमध्ये खेळला जाणारा कसोटी सामना हा रोहितचा शेवटचा सामना असू शकतो, असंही काहींच मत आहे. सिडनी कसोटी सामन्याला 3 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. हा सामना जर पूर्ण पाच दिवस चालला तर सात जानेवारी हा रोहित शर्माच्या कसोटी कारकि‍र्दीचा शेवटचा दिवस असू शकतो. याच दिवशी तो कसोटीमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.

रोहितची इच्छा काय

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार बीसीसीआयचे पदाधिकारी व टीम इंडियाच्या निवड समितीनेही रोहित शर्माच्या निवृत्तीची चर्चा सुरू केली आहे. मात्र रोहित शर्माने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापर्यंत निवड समितीकडे वेळ मागितला आहे. भारत या सिरीजच्या फायनलमध्ये पोहोचला, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यानंतर रोहित शर्मा कसोटीमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो, असंही काहींच मत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+