विराट कोहलीने IPLच्या मध्यातच इंन्स्टावरील पोस्ट का हटवल्या, त्यामागील नेमकं कारण काय?-रिपोर्ट
IPL 2025 Virat Kohli News : क्रिकेटपटू आणि आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सर्वाधिक चाहता खेळाडू विराट कोहली कायमच चर्चेत असतो. रनमॅन अशी ज्याची ओळख आहे. आरसीबी जेव्हा जेव्हा अडचणीत सापडते, तेव्हा विराट मोठ्या ताकदीने त्याच्या पाठीमागे उभा राहतो. त्याची प्रचिती देखील नुकत्याच मुंबई इंडियन्स बरोबर झालेल्या मॅचमध्ये पाहायला मिळाली. एकीककडे विराट कोहलीचे कौतुक होत असतानाच त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित बातमी समोर आली आहे.

काही रिपोर्टनुसार, आयपीएल दरम्यान, विराट कोहलीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवरून सर्व महत्त्वाच्या पोस्ट डिलीट केल्याची बातमी समोर आली आहे. त्याने हे का केले किंवा त्यामागील कारण अद्याप कळलेले नाही, परंतु विराट कोहलीच्या या निर्णयानंतर मात्र सोशल मीडियावर वेगळ्याच प्रकारची खळबळ उडाली आहे. त्यामुळे यासंबंधित प्रकरण नेमकं काय आहे, ते किती सत्य आहे, याविषयी जाणून घेऊया..!
विराटने त्याच्या पोस्ट डिलीट केल्या?
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीबद्दल अशी माहिती समोर आली आहे की, त्याने त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरून जाहिरातींशी संबंधित सर्व पोस्ट काढून टाकल्या आहेत. याबाबत viralbhayani यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले की विराट कोहलीने त्यांच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरून सर्व जाहिराती संबंधित काढून टाकल्या आहेत.
सोशल मीडियावर सक्रिय राहणे म्हणजे वेळ आणि शक्ती दोन्हीचा अपव्यय आहे असे त्याला वाटत असल्याने, वैयक्तिक सोशल मीडिया पोस्टवर कमी आणि आयुष्यावर आणि क्रिकेटवर जास्त लक्ष केंद्रित करण्याच्या त्याच्या मागील निर्णयानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. तथापि, विराट कोहलीने जाहिराती का काढल्या याबद्दल कोणतेही अधिकृत विधान त्याने केलेले नाही. पण विराट चाहत्यांनी मात्र या पोस्टवर जोरदार प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे.
काय म्हणाले चाहते?
विराट कोहलीने पोस्ट डिलीट केलेल्या प्रकरणानंतर आता चाहत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. एका चाहत्याने पोस्टवर कमेंट केली आणि लिहिले की ही पोस्ट फक्त करार जितक्या महिन्यांसाठी आणि वर्षांसाठी असेल तितकीच ठेवली जाईल.
एका चाहत्याने कमेंट केली आणि आयपीएल ट्रॉफीची पोस्ट शेअर करायची आहे, त्यामुळे जुन्या सर्व पोस्ट त्याने आता डिलीट मारल्या असतील.

तर आणखी एका चाहत्याने त्यावर कमेंट केली की, विराटने जर जाहीराती संबंधित पोस्ट डिलीट मारल्या असतील तर मग पैसे परत करतानाचे देखील पोस्ट त्याने टाकल्या पाहिजे.












Click it and Unblock the Notifications